मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेत मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश; तीन खेळाडूंना अटक
South African Cricket : क्रिकेटसारख्या जंटलमन खेळात मॅच फिक्सिंगचे गैरप्रकार घडू लागले आहेत. मॅच फिक्सिंग करणं मोठा गुन्हा आहे. हा अपराध उघडकीस आला तर तुरुंगाचीही हवा खावी लागते तसेच करिअर संपण्याचाही धोका असतो. अशातच आता मॅच फिक्सिंगचा प्रकार दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार आताचा नाही तर आठ वर्षांपूर्वी घडला होता मात्र त्याचा खुलासा आता झाला आहे. या प्रकरणी तीन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडू्ंना 18, 28 आणि 29 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. या खेळाडूंवर 2015-16 मध्ये रॅम स्लॅम चॅलेंज टूर्नामेंटमध्ये मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात थामी सोलेकिल, लोनावो त्सोटोब आणि एथी मबालाती यांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही माजी खेळाडूंना याच महिन्यात वेगवेगळ्या दिवशी अटक केली. डीपीसीआयच्या भ्रष्टाचार तपास विभागाने या खेळाडूंना अटक केली. या प्रकरणाचा तपास 2016 मधील एका व्हिसलब्लोअर द्वारे झालेल्या मोठ्या खुलाशाच्या आधारावर होती.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अँटी करप्शन अधिकाऱ्यांना काही संशयास्पद हालाचाली लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू करण्यात आला होता. थामी सोलेकिल आणि लोनावो त्सोटोबे या दोघांवर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ करप्शन अॅक्ट, 2004 (PRECCA) नुसार पाच आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या दोन्ही खेळाडूंना शुक्रवारी प्रिटोरियातील स्पेशलाइज्ड कमर्शिअल क्राइम कोर्टात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली आता पुढील सुनावणी 26 फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे.
गुलाम बोदीचंही नाव समोर
या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती हाती आली. गुलाम बोदी नावाचा व्यक्तीने अनेक खेळाडू्ंशी संपर्क करून तीन टी 20 सामन्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय सट्टेबाजांबरोबर तो या प्रकरणात सहभाग होता. बोदीला 2018 मध्येच अटक करण्यात आली आहे. 2019 मध्ये त्याला आठ प्रकरणांत दोषी धरण्यात आले. यानंतर त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
India VS South Africa: संजू सॅमसनने थेट इतिहास रचला ! टी-20 क्रिकेटमध्ये सलग दुसरे जबरदस्त शतक
अटक करण्यात आलेल्या तीन माजी खेळाडूंत फक्त लोनावो त्सोटोबे हाच फक्त दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीममध्ये काही काळ होता. त्याने 5 कसोटी, 61 वनडे आणि 23 टी 20 सामने खेळले आहेत. त्सोटोबेने 2014 मध्ये त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. थामी सोलेकिल आणि एथी मबालाती यांचं क्रिकेट करिअर प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटपर्यंतच मर्यादित राहिलं.