India vs South Africa 4th T20I : संजू सॅमसन अन् तिलक वर्माची ‘रेकॉर्डब्रेक’ इनिंग, आफ्रिकेला 284 धावांचे लक्ष्य
India vs South Africa 4th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना जोहान्सबर्ग (johannesburg) येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने आफ्रिकेला 284 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 73 धावांची भागीदारी झाली. अभिषेक 18 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्यात दुस-या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी झाली. संजू सॅमसनने मालिकेतील दुसरे शतक झळकावले.
भारताकडून संजू सॅमसनने 109 आणि टिलक वर्माने 120 धावा केल्या. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 210 धावांची विक्रमी भागीदारी झाली. भारतीय डावात एकूण 23 षटकार मारले गेले. T20 सामन्यात विदेशात ही भारताची सर्वात मोठी धाव संख्या आहे. चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे.
भारताची रेकॉर्डब्रेक इनिंग
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. विदेशात T20 सामन्यात भारताने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताने या सामन्यात तब्बल 283 धावा केल्या. तर एका वर्षात 3 शतके करणारा संजू सॅमसन पहिला खेळाडू ठरला आहे.
तर सलग दोन शतके करणारा टिलक वर्मा (Tilak Verma) दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याच बरोबर संजू सॅमसन आणि तिलक वर्माने टी-20 सामन्यात भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम देखील मोडला आहे. दोघांनी 210 धावांची भागीदारी केली. T20 क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 2 शतके झळकावली. तसेच भारताने T20 क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 2 शतके झळकावली. याच बरोबर भारताने एका डावात एकूण 23 षटकार ठोकले.