संजय मल्होत्रा ​​आरबीआयचे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला स्वीकारणार पदभार

  • Written By: Published:
संजय मल्होत्रा ​​आरबीआयचे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला स्वीकारणार पदभार

RBI Gov Sanjay Malhotra: शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांच्या जागी सरकारने संजय मल्होत्रा ​​(Sanjay Malhotra) यांची आरबीआय गव्हर्नर (RBI Governor) म्हणून नियुक्ती केली आहे. कॅबिनेट समितीने त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी निवड केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.

श्रीलंकेचा पराभव अन् दक्षिण आफ्रिकेने दिला ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, WTC टेबलमध्ये फेरबदल 

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत असल्याने मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली.  शक्तीकांत दास  यांना एक्स्टेन्शन मिळणार अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून संजय मल्होत्रा ​​यांची आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली.  संजय मल्होत्रा आरबीआयचे 26 वे गव्हर्नर असणार आहे. बुधवारी (11 डिसेंबर) रोजी संजय मल्होत्रा ​​नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांची नियुक्ती 3 वर्षांसाठी आहे. सध्या त्यांच्याकडे महसूल सचिवपदाचा कार्यभार आहे.

कोण आहेत संजय मल्होत्रा ? 

संजय मल्होत्रा ​​हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कानपूर) येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.

‘बेळगाव कारवार’ केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; आदित्य ठाकरेंची CM फडणवीसांकडे मागणी… 

संजय मल्होत्रा ​​हे आरईसीचे कर्मचारी आहेत आहेत. ते लिमिटेड या सरकारी कंपनीचे ​​अध्यक्ष आणि एमडीही राहिले आहेत. त्यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. त्यांनी राजस्थानमध्ये ऊर्जा विभागाचे प्रभारी प्रधान सचिव म्हणूनही काम केले आहे. यासोबतत ते वित्तीय सेवा विभागात सचिव देखील राहिलेले आहेत.

संजय मल्होत्रा ​​यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणीचा व्यापक अनुभव आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube