UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली ‘ही’ माहिती

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली ‘ही’ माहिती

Digital Payment Awareness Week : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI द्वारे दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट दिले आहेत. त्यांनी सांगितले की, एका वर्षात UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा 36 कोटींच्याही पुढे गेला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये हा आकडा 24 कोटी एवढा होता. आरबीआयच्या मुख्य कार्यालयात डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताहाचे उद्घाटन करताना शक्तीकांत दास यांनी सांगितले की, मूल्याच्या दृष्टीने हा व्यवहार 6.27 लाख कोटी रुपये एवढा आहे.

1000 कोटींचा आकडा पार केला
हा आकडा फेब्रुवारी 2022 मध्ये नोंदवलेल्या 5.36 लाख कोटी रुपयांपेक्षा 17 टक्के अधिक आहे. ते म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांपासून मासिक डिजिटल पेमेंट व्यवहार प्रत्येक वेळी 1,000 कोटी रुपयांचा टप्पा पार करत आहे. RBI गव्हर्नर म्हणाले की, UPI आणि सिंगापूरच्या पेनाऊ यांच्यातील करारानंतर, इतर अनेक देशांनी देखील पेमेंटसाठी असा करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Pawar Vs Vikhe : फडणवीसांनी डाव टाकला अन पवारांचा ‘काटा’ काढला!

UPI-पेनाऊ कराराला 10 दिवस झाले
गव्हर्नरने सांगितलं की, किमान अर्धा डझन देश हे करार करतील. UPI आणि पेनाऊ करारावर स्वाक्षरी होऊन 10 दिवस झाले आहेत. या कालावधीत सिंगापूरमधून पैसे पाठवण्यासाठी 120 आणि सिंगापूरला पैसे पाठवण्यासाठी 22 व्यवहार झाले. त्यांनी पुढं सांगितलं की, आम्ही आमच्या पेमेंट सिस्टीमचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि भारत-सिंगापूरच्या प्रॉम्प्ट पेमेंट सिस्टमच्या यांच्यातील लिंकेजसाठी अनेक पावले उचलली आहेत.’

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube