आमदार संग्राम जगतापांना मंत्री करा; भिंगारकरांचा शुक्लेश्वर मंदिरात महाअभिषेक

आमदार संग्राम जगतापांना मंत्री करा; भिंगारकरांचा शुक्लेश्वर मंदिरात महाअभिषेक

अहिल्यानगर : नगर शहर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा सलग निवडून आलेले आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक करण्यात आला. शुक्लेश्‍वर मंदिरात विधीवत पूजा पार पडली. याप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, अनिल तेजी, किशोर उपरे, गणेश उपरे, विशाल (अण्णा) बेलपवार, दीपक राहिंज, विशाल राहिंज, आनंद क्षीरसागर, रत्नदीप गारुडकर, प्रमोद जाधव, दिनेश लंगोटे, योगेश देवतरसे, करण पाटील, रवी नामदे आदींसह भिंगारमधील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, संग्राम जगताप हे युवकांचे नेतृत्व असून त्यांनी शहर व उपनगरांचा कायापालट केला आहे. त्यांच्या माध्यमातून शहराला मंत्रीपदाची संधी मिळावी ही सर्वसामान्य नगरकरांची इच्छा आहे. अनेक वर्षांपासून शहराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार जगताप यांना मंत्रीपद मिळावे ही सर्वांची इच्छा आहे.

दुपदरी उड्डाणपूल अन् एमआयडीसीचा विस्तार, 2029 साठी संग्राम जगतापांचे व्हिजन कोणते?

शिवम भंडारी म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार जगताप यांना मंत्रीपद मिळणे आवश्‍यक आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन शहरातील विकासकामे मार्गी लावली आहेत. विकासात्मक व्हिजन असलेले आमदार जगताप यांची मंत्रीमंडळाला देखील चांगली मदत होणार आहे. शहराच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. विकासाचे व्हिजन ठेऊन त्यांनी केलेल्या कामाला यापुढे अधिक गती मिळणार आहे. तर त्यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न नक्कीच साकारले जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube