दुपदरी उड्डाणपूल अन् एमआयडीसीचा विस्तार, 2029 साठी संग्राम जगतापांचे व्हिजन कोणते?

  • Written By: Published:
दुपदरी उड्डाणपूल अन् एमआयडीसीचा विस्तार, 2029 साठी संग्राम जगतापांचे व्हिजन कोणते?

Sangram Jagtap : गेल्या 10 वर्षात अहमदनगर विधानसभा मतदारसंघात (Ahmednagar Assembly Constituency) अनेक विकासाची कामे झाली आहे आणि येत्या काळात नगरला मेट्रो सिटी बनविण्यासाठी व्हिजन 2029 महत्वाचे पाऊल ठरणार असल्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली. तसेच गेल्या 10 वर्षात झालेले कामे काल्पनिक नसून, ऑन रेकॉर्ड आहेत असं देखील संग्राम जगताप म्हणाले.

सहकार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शहराचा भूतकाळ व बदलते भविष्य याबाबत महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की, नगर शहराच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला. या निधीतून सध्या मतदारसंघात अनेक कामे सुरु आहे. ही कामे कागदोपत्री आहेत. माहितीच्या अधिकारात माहिती मागू शकता. कारण हे काल्पनिक व्हिजन नाही. असं या कार्यक्रमात बोलताना संग्राम जगताप म्हणाले. यावेळी त्यांनी प्रगतिपथावरील कामे कोणती सुरु आहे आणि नगरच्या विकासाचे व्हिजन 2029 साठी कोणते काम करणार याबाबत देखील माहिती दिली.

प्रगतिपथावरील कामे

प्रमुख डीपी रस्त्यांचे मजबुतीकरण अंतिम टप्प्यात

विविध 42 भागांमधील रस्त्यांची 400 कोटींची कामे

मुळा धरण ते विळद घाट, ते वसंत टेकडीदरम्यान पाइपलाइन, पंपिंग स्टेशन आणि साठवण टाक्यांकरिता 137 कोटींचा निधी

शहर कचराकुंडीमुक्त करण्यासाठी घंटागाड्या उपक्रम सुरू

मलनिस्सारण व्यवस्थेसाठी नवीन भुयारी गटार योजना

बुरुडगाव येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू

सावेडीत सुरू केलेले अद्ययावत हॉस्पिटलचे काम प्रगतिपथावर

चौकांचे सुशोभीकरण व महापुरुषांची स्मारके उभारण्यास सुरुवात

वाडिया पार्क विकासासाठी 15 कोटींचा निधी

केडगाव येथे नवीन स्पोर्टस् कॉम्प्लेक्सची निर्मिती करणार

माळीवाडा, बसस्थानक क्रमांक 3 (पुणे), तारकपूर बसस्थानकांच्या नूतनीकरणाचे काम सुरू

जिल्हा ग्रंथालयाची नव्याने उभारणी करण्याचे नियोजन

सावेडीत नाट्यगृहाची निर्मिती करण्याचे काम प्रगतिपथावर

नगरच्या विकासाचे व्हिजन 2029 कोणते काम करणार  

पाणीपुरवठ्यासाठी फेज 3 पाणी योजनेसाठी 850 कोटींचा प्रस्ताव

मनपाच्या शाळा डिजिटल व वातानुकूलित करणार

गंजबाजार येथील भाजी मार्केटची अद्ययावत इमारत

आबालवृद्धांसाठी निसर्ग संपन्न उद्यानांचा विकास

सीना नदी परिसरात ऑक्सिजन पार्कची निर्मिती

प्रदूषणमुक्त ई बससेवा सुरू करणार

महिलांसाठी नामांकित गृहउद्योगांमार्फत रोजगारनिर्मिती

बुरुडगाव व मुकुंदनगर भागांमध्ये ज्येष्ठ नागरिक भवन

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणार

पिंपळगाव माळवी येथे 650 एकर जागेत थीम पार्क उभारणार

डी. एस.पी. चौक, एमआयडीसीमधील सन फार्मा चौक आणि सह्याद्री चौकात दुपदरी उड्डाणपूल

विरोधकांनी रक्ताचे शोषण केले, सांगता सभेत हर्षदा काकडेंचा विरोधकांवर हल्लाबोल 

एमआयडीसीचा विस्तार करून मोठे उद्योग आणणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube