विरोधकांनी रक्ताचे शोषण केले, सांगता सभेत हर्षदा काकडेंचा विरोधकांवर हल्लाबोल

  • Written By: Published:
विरोधकांनी रक्ताचे शोषण केले, सांगता सभेत हर्षदा काकडेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Harshada Kakade : शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात (Shevgaon – Pathardi Assembly Constituency) यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच काल जनशक्ती विकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांनी प्रचाराच्या सांगता सभेत मतदारसंघातील साखरसम्राटांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी मी आणि शिवाजीराव काकडेंनी या मतदारसंघातील लोकांना विचारले आणि त्यानंतर निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी अपक्ष नाही तर जनतेने जनतेसाठी दिलेली उमेदवारी आहे. असं या सभेत बोलताना हर्षदा काकडे म्हणाल्या.

तसेच या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात तीन साखरसम्राट उभे आहे. केदारेश्वर साखर कारखान्याचे प्रतापकाका ढाकणे, वृद्धेश्वर साखर कारखान्याचे मोनिका राजळे आणि ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे घुले हे तिन्ही साखरसम्राट कसे आहे हे तुम्हाला सांगायची आवशक्यता नाही. तिन्ही साखरसम्राटांनी तुमचं आणि आमचं रक्ताचे शोषण केले आहे. यांनी लोकांचे पैसे दिले नाही. असं आरोप देखील त्यांनी या सभेत केला.

तसेच ज्ञानेश्वर साखर कारखान्यात 300 रूपयांप्रमाणे पेमेंट कपात केले तर वृद्धेश्वरने 126 रूपये कपात केले. या लोकांनी शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम केले आहे असं देखील हर्षदा काकडे म्हणाल्या.

अॅड. साहेबांवर मोठा प्रसंग आला. मधल्या प्रसंगाच्या काळात काही माणसे अशी पाठवली की अॅड. काकडे यांना काही लोक म्हणाले की तुम्ही नाटक करता, त्यांच्या पिल्लांनी असे का करावे. या निवडणूकीत परमेश्वराने चांगली वेळ दिली आहे. कॉ. आबासाहेबांनी काम केले तेच आम्ही चालू ठेवले आहे. शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणून त्यांना दिशा द्यायची आहे. रस्त्यांची , वीजांची व पाण्याच्या कामात हे लोक धनदांडगे झाले आहे. असेही सांगता सभेत हर्षदा काकडे म्हणाल्या.

“आघाडीशी प्रामाणिक न राहणाऱ्यांनी आम्‍हाला पक्षनिष्‍ठा शिकवू नये”, विखेंचा थोरातांवर हल्लाबोल

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे.

श्रीगोंदा मतदारसंघाच्या विकासासाठी साथ द्या; अनुराधा नागवडेंचं आवाहन, आढळगावात सभा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube