श्रीगोंदा मतदारसंघाच्या विकासासाठी साथ द्या; अनुराधा नागवडेंचं आवाहन, आढळगावात सभा

श्रीगोंदा मतदारसंघाच्या विकासासाठी साथ द्या; अनुराधा नागवडेंचं आवाहन, आढळगावात सभा

Shrigonda News : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. काल तालु्क्यातील आढळगाव येथे सभा घेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन त्यांनी मतदारसंघातील जनतेला केलं. अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ आढळगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

पक्षांतराचा श्रीगोंदा पॅटर्न! कुणाच्या पारड्यात पडणार वजन, दिग्गजांच्या पक्षांतराने बदललं लढतीचं गणित

नागवडे पुढे म्हणाल्या, राज्यात आता बदलाचं वारं दिसून येत आहे. जनतेला बदल हवा आहे. त्यामुळे राज्यात आता महाविकास आघाडीचंच सरकार येणार असा विश्वास आहे. तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य राहणार आहे. सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे तुम्ही विधानसभेत जाण्याची संधी मला द्या, असे आवाहन अनुराधा नागवडे यांनी केलं.

मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर नागवडे कुटुंबातील व्यक्ती पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्याची गरज आहे. त्यासाठी आता अनुराधा नागवडे यांच्या पाठिंबा द्या. नागवडे कुटुंबाकडे विकासाच दृष्टी आहे. सध्याही अनेक संस्था नागवडे कुटुंबियांकडून यशस्वीपणे चालवल्या जात आहेत असे अॅड. सुनील भोस यावेळी म्हणाले. यावेळी सुनंदा पाचपुते, दादासाहेब गव्हाणे, राजाराम गदादे, दत्तात्रय चव्हाण, गोरख ठवाळ, रघू सूर्यवंशी, गणेश गाढवे, शिवदास शिंदे, सुभान तांबोळी, बाळासाहेब शिंदे, रवींद्र दरोडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या विरोधात एक भाजपचे अधिकृत तर एक अनधिकृत उमेदवार, अनुराधा नागवडेंचा विरोधकांना टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube