माझे तिकीट कापले, आता त्याची परतफेड करण्याची वेळ ; हर्षदा काकडे यांचा मोनिका राजळेंवर हल्लाबोल

  • Written By: Published:
माझे तिकीट कापले, आता त्याची परतफेड करण्याची वेळ ; हर्षदा काकडे यांचा मोनिका राजळेंवर हल्लाबोल

Shevgaon Assembly constituency : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून (Shegaon Assembly Constituency) जनशक्ती विकास आघाडीच्या हर्षदा काकडे (Harshada Kakade) या रिंगणात उतरल्या आहेत. विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे यांच्याविरोधात त्यांनी राळ उठविली आहे. मोनिका राजळे यांना निवडून आणण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम केले पण माझे जिल्हा परिषदेचे तिकीट त्यांनी नाकारले. आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली असल्याचे हर्षदा काकडे यांनी म्हटले आहे.

ढाकणेंच्या एन्ट्रीने उमेदवारीचा पत्ता कसा कट झाला ? हर्षदा काकडेंनी सांगितली बंडखोरीमागची स्टोरी

लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत हर्षदा काकडे म्हणाल्या, 2014 ला मोनिका राजळे यांना तिकीट जाहीर झाले. तेव्हा आम्ही मोनिका राजळे यांच्याबरोबरच राहिलो. तेव्हा भाजपमध्ये होतो. मोनिका राजळे यांच्यासाठी खांद्याला खांदा लावून काम केले पण नंतर त्यांनी माझे जिल्हा परिषदेचे तिकीटही नाकारले. मग तेव्हा ठरविले बंडखोरी करायची. जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. जनतेने मला अपक्ष म्हणून स्वीकारले. २०१४ आणि २०१७ तिकीट नाकारले आहे. आता त्याची परतफेडीची वेळ आली आहे. लोकांच्या मनात आहे. लोक बोलवून दाखवितात, तुमच्यावर अन्याय झालेला आहे. आम्ही त्याची परतफेड करणार असे ते सांगत होते.

तिकीट कापले, लोक रडत रडत निघून गेले

2014 च्या विधानसभेला प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आमच्यासाठी जागा मोकळी झाली. तेव्हा आम्ही भाजपकडून लढण्यासाठी एकमेव होतो. तेव्हा माझे पती शिवाजीराव काकडे यांना तिकीट देण्यात आले. आमच्या दोघापैकी कुणाला तिकीट जाहीर झाले असले तरी ते आम्हाला चालत होते. तिकीट मिळाल्यानंतर एबी फॉर्मवर माझ्या पतींची सही झाली. देवळाली प्रवरा येथील चंद्रशेखर कदम हे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्याकडे एबी फॉर्म आला. त्यांच्याकडे सही झाली. त्यांनी सांगितले पुढे जावून सभेची तयारी करा. सकाळी येतो आणि एबी फॉर्म घेऊन येतो. आपण फॉर्म भरू. काकडेसाहेब हे शेवगावला आले. सभेची तयारी केली. सकाळी सभा सुरू केली. पंधरा ते वीस हजार लोक शेवगावला सभेसाठी आले होते. लोकांचे भाषणे सुरू होते. अचानक काकडेसाहेब यांना एका राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोन आला. तुम्ही, सभा कशासाठी घेता आहात ? तुमचे तिकीट कापले आहे. मोनिका राजळे या फॉर्मात भरत आहेत. हे आमच्यासाठी हे धक्कादायक होते. पण साहेब हे अधात्मामध्ये असल्याने त्यांनी तो धक्का सहन करत भाषण करणारे व्यक्तीला खाली बसवून त्यांनी भाषण सुरू करून भारतीय जनता पार्टीवर भाषण केले. कदाचित तिकीटामध्ये गडबड झालेली आहे. तरी सुध्दा मुंडेसाहेबांना श्रद्धांजली म्हणून भाजपमध्ये राहायचे आहे, असे त्यांनी सांगितले. तेव्हा वीस हजार लोकांच्या जेवनाची सोय केली होती. पण लोक जेवण न करता तसेच रडत-रडत निघून गेले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube