मोनिका राजळेंची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी मदत करा, पंकजा मुंडेंचे आवाहन

  • Written By: Published:
मोनिका राजळेंची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी मदत करा, पंकजा मुंडेंचे आवाहन

Pankaja Munde : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज भाजपच्या (BJP) स्टार प्रचारक पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात (Shevgaon – Pathardi Assembly Constituency) भाजप आणि महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या प्रचारार्थ कृषी उत्पादक बाजार समिती येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी मोनिका राजळे यांना प्रचंड मताने विजय करा असा आवाहन मतदारांना केले.

या जाहीर सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार आले आहे आणि आता आपल्याला राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणायचे आहे. देशात मोदींनी हॅट्रिक केली आहे. आता तुम्ही देखील मोनिका राजळे यांची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी मदत करा असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा असतो आणि कधी कधी त्या अजेंडेच्या रूप बदलतो आणि त्याच्या एक स्पिरिट तयार होतो आणि तेच स्पिरिट निवडणुकीला दिशा देतो. पण मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे स्पिरिट तयार झाला त्याचा फायदा देशाला झाला नाही. मात्र आता या निवडणुकीत जे स्पिरिट तयार झाला आहे ते स्पिरिट महायुतीचं सरकार आण्याचा स्पिरिट आहे.

या मतदारसंघात मोनिका राजळे यांनी अनेक विकासकामे केली आहे. मी देखील मंत्री असताना अनेक कामांसाठी विकास निधी दिला होता. महायुती सरकारने लाडक्या बहिणींना साडे सात हजार रुपये दिले आहे आणि पुढे देखील देणार आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच सरकारने कृषी पंपाचे वीज बिल माफ केलं आहे. तसेच महायुती सरकार आली तर किसान सम्मान योजनेत शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील आपले मत फक्त आणि फक्त महायुती सरकारला द्या असं आवाहन देखील त्यांनी या सभेत बोलताना केले.

जनतेला सांगा…आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा संपवणार, जातीय जणगणना करणार ; प्रियांका गांधीचं PM मोदींना आव्हान

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करणार की महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे धक्का देत बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube