जनतेला सांगा…आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा संपवणार, जातीय जणगणना करणार ; प्रियांका गांधीचं PM मोदींना आव्हान

जनतेला सांगा…आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा संपवणार, जातीय जणगणना करणार ; प्रियांका गांधीचं PM मोदींना आव्हान

Priyanka Gandhi Sabha for Congress candidate Prabhavati Ghogre : विधानसभेच्या रणधुमाळीत प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी पक्षश्रेष्ठी मैदानात उतरले आहेत. कांग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogre) यांच्यासाठी प्रियांका गांधी यांची (Priyanka Gandhi) जाहीर सभा झाले. यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, ही एक पवित्र भूमी आहे. येथूनच स्वातंत्र्याची लढाई मजबूत झालीय. या धर्तीच्या कणाकणात समानता असल्याचं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

शरद पवारांनी भरसभेत केलं भावनिक आवाहन ; महाराष्ट्राचं राजकारण बदलायचं असेल, तर महाविकास आघाडीला…

यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, येथे अ़़डीच वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. याकाळात सत्याची किंमत काय आहे? या मंचांवरून बडे बडे नेते केवळ घोषणा करतात. त्यांना जनतेची काहीच पर्वा नाहीये. माझ्या भावासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात. मी राहुल गांधीची बहीण या नात्याने सांगते की, आमची विचारधारा, राजनितीक विचारसरणी वेगळी (Assembly Election 2024) होती. परंतु शिवाजी महाराजांचा अपमान आमच्यातलं कोणीच करत नाही. मंचावरून मोदींनी सांगावं की, आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा संपवणार. जे जातीय जणगणना करणार, असं आव्हान भरसभेत प्रियांका गांधी यांनी दिलं आहेत.

देवेंद्र फडणवीस पाकिस्तानात निवडणूक लढवतायंत काय?, राऊतांचा ‘व्होट जिहाद’वरून जोरदार वार

कॉंग्रेसने कर्जमाफीची मागणी केल्यानंतर सत्ताधारी पैसे नसल्याचं सांगतात. मग मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज कशी माफ केलीत? असा सवाल प्रियांका गांधी यांनी केलीय. जनता सर्व बघत आहे. दोन लाख सरकारी पदं रिक्त आहेत. उद्योगधंदे, रोजगार दुसऱ्या राज्यात पाठवले. महाराष्ट्रातील तरूणांकडे नोकरी नाही, या सर्व उत्तरं द्यावी लागतील. धर्म-जातीच्या नावावर कशी फूट पाडली जाईल, याकडे यांचं लक्ष आहे अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. पैशांच्या बळावर, गुंडागर्दीने मागच्या वेळी सरकार चोरलं, असा आरोप देखील प्रियांका गांधी यांनी केलाय.

महाविकास आघाडीनं काही आश्वासने दिली आहेत, ज्यात महिलांनी तीन हजार रूपये प्रतिमहिना, मोफत बसप्रवास यांचा समावेश आहे. जो धमकावतो, तोच सर्वात मोठा डरपोक असतो, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केलीय. एक असं सरकार आणा, जे दिवसरात्र तुमच्यासाठी काम करेन. तुमचा सन्मान करेन, ज्यांच्या योजना तुमच्यासाठी असेल, फक्त उद्योगपतींसाठी नसतील. यावेळी असं बहुमत द्या, जेणेकरून कोणी सरकार चोरू शकणार नाही. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असं आवाहन देखील प्रियांका गांधींनी भरसभेत केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube