संग्राम जगतापांचं बळ वाढलं, ओबीसींच्या बैठकीत निवडून देण्याचं आवाहन
Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना विविध संघटना आणि समाजघटकांचा पाठिंबा वाढत चालला आहे. महायुती सरकारने ओबीसी घटकांना न्याय देण्याचं काम केलं आहे. तेव्हा आता ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले.
आ. जगताप यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने शहरातील ओबीसी समाजबांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण आखाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच संग्राम जगताप यांना निवडून देण्याचे आवाहन समाजबांधवांना केले. या बैठकीसाठी प्रा. माणिक विधाते, नगरसेविका शीतलताई जगताप, गवळी समाजाचे प्रतिनिधी प्रकाश भागानगरे, सकल माळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, वंजारी समाजाचे प्रतिनिधी आनंद लहामगे, अनिल निकम, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. आर. शेंडगे, नाभिक समाजाचे प्रतिनिधी नंदकुमार मोरे.
धनगर समाजाचे प्रतिनिधी काका शेळके, चर्मकार संघाचे संजय खामकर, शहर ओबीसी अध्यक्ष अमित खामकर, विनायक गाडेकर, अनिल इवळे, विकास मदने, मारुती पवार, उमेश धोंडे, भरत गारुडकर, रोहित इवळे, मयूर जाधव, गणेश पांढरे, अथर्व राऊत, रोहित पडोळे, प्रथमेश रोकडे, तुषार टाक, अभिजीत ढाकणे, अनिकेत येमुल, अथर्व रेखी, आयुष चव्हाण, मयूर जाधव, अभिषेक चिपाडे, नारायण चिपाडे आदींसह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संग्राम जगतापांची ताकद वाढली, तब्बल 53 व्यापारी संघटनांनी दिला पाठिंबा
महायुती सरकारने परीट समाजासाठी संत गाडगे महाराज महामंडळ, तेली समाजासाठी संताजी जगनाडे महाराज महामंडळ, सुवर्णकार, लिंगायत, वाणी, कोळी, रामोशी, नाभिक आणि जैन समाजासाठीही महामंडळांची स्थापना केली आहे. या माध्यमातून ओबीसी समाज घटकांना न्याय दिला आहे, असे आखाडे यावेळी म्हणाले.