Download App

sujay vikhe : मोदींसोबत विखे कुटुंबाचा फोटो, उमेदवारीचे टेन्शन गेले?

Sujay Vikhe : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घराणेशाहीवर मोठे भाष्य केले आहे. एकाच कुटुंबातील दहा जण राजकारणात येणं यात गैर काहीच नाही. पण जो पक्ष कुटुंबातून चालवता जातो, ती घराणेशाही आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. दरम्यान नगर जिल्ह्यातही अनेक राजकीय कुटुंबात परंपरेने घरातीलच चेहरे पुढे राजकारणात आलेले दिसून येतात. यामुळे त्यांच्यावर टीका देखील होते मात्र मोदी यांच्या या वक्तव्याने खासदार सुजय विखे (sujay vikhe) यांच्या उमेदवारीचे टेन्शन गेलं आहे.

भाजपात अनेक कुटुंबात स्थानिक पातळीवर परिवारवाद वा घराणेशाहीचा ठपका दिसून येतो आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना उमेदवारी मिळेल का? अशी शंका पक्षातीलच काही नेतेमंडळी उपस्थित करत होते, मात्र मोदींनी संसदेत घराणेशाहीवर केलेली भाजपाची नवीन व्याख्या पाहता परंपरागत पद्धतीने अनेक वर्ष राजकारणात असलेल्या विखे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यातही अनेक राजकीय कुटुंबात परंपरेने घरातीलच चेहरे पुढे राजकारणात आलेले दिसून येतात. असे चेहरे सर्वच पक्षांमध्ये असले तरी सध्या येणारी लोकसभा निवडणूक पाहता एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे मंत्री पदावर असताना त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळेल का अशी शंका विरोधकांसह खुद्द पक्षातीलच नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते चर्चा करताना खाजगीतून दिसून येत होते.

अदृश्य शक्तींनी शरद पवारांकडून पक्ष हिसकावला; सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका

कोणी लॉबिंग आणि शिफारशी करून उपयोग नाही अशीही वक्तव्ये त्यांना पक्षातीलच काही नेतेमंडळींकडून करण्यात येत होती. मात्र आता कुठेतरी मोदी यांनीच भारतीय जनता पक्षामध्ये एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलेला दिसून येतोय आणि लोकसभेत जर भाजपला 370 पेक्षा किंवा एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा जिंकायचे असतील तर अनेक ठिकाणी विद्यमान असलेल्या आणि सक्षम असलेल्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी द्यावी लागणार अशी परिस्थिती आहे.

आम्हीही मराठीच, पक्ष पळवण्याचा प्रश्नच नाही; अजितदादांचं सुळेंना प्रत्युत्तर

घराणेशाही आणि एकाच कुटुंबात एकालाच पद असे करून चालणार नाही. त्यामुळेच मोदी यांनी संसदेत गांधी घराण्यातील परिवारवाद आणि घराणेशाही वर विरोध करत टीका केली. दरम्यान असे असली तरी काँग्रेस आणि भाजपमधील परिवारवाद यामध्ये स्वतंत्र विश्लेषण करत आमच्या पक्षांमध्ये नवीन आणि जनतेचा पाठिंबा असलेल्या नव्या पिढीला उमेदवारी देणे म्हणजे हा परिवा वाद नसल्याचे आता स्पष्ट केले आहे.

पक्ष अन् चिन्ह बळकावलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबतच…रोहित पवारांची तिखट टीका

मोदी नेमकं काय म्हणाले?
एकाच कुटुंबातील अनेकांनी राजकारणात येणं चुकीचं नाही. नवे चेहरे, तरुण चेहरे राजकारणात यायला हवेत अशी आमचीही भूमिका आहे. एखादं कुटुंब आपल्या क्षमतेच्या जोरावर, लोकांच्या पाठिंब्यावर राजकारणात प्रगती करत असेल तर त्याला आम्ही त्याला कधीच घराणेशाही म्हणत नाही. पण जो पक्ष एक कुटुंब चालवतो. त्या पक्षाचे सर्व निर्णयही एका कुटुंबाकडून चालवले जातात, त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो. एखाद्या कुटुंबातील दोन सदस्य प्रगती करत असतील तर मी त्यांचं स्वागत करेन. दहा जणांनीदेखील प्रगती केली तरी मी त्यांचं स्वागत करेन. नव्या पिढीचं स्वागत करणं योग्य आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
मोठी बातमी! अजित पवार गटाला ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह’ मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय

follow us