Download App

तीन महिन्यांपूर्वीच तयारी; शरद पवारांच्या पक्षाला मिळणार हे ‘नाव’ अन् ‘चिन्ह’

Ncp symbol and party : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष (Ncp symbol and party) आता अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे राहणार हे निश्चित झाले आहे. या निकालानंतर शरद पवार गट नव्या निवडणूक चिन्ह उगता सूर्याची मागणी करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक आयोगाने आज (दि. 6) मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाची चर्चा सुरू होती. आज अखेर निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर शरद पवार गटाकडून उगवता सूर्य या नव्या निवडणूक चिन्हाची मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही; EC चा निर्णय येताच अजितदादांनी आव्हाडांना सुनावलं

शरद पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दिल्लीतील वकिलांशी चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत हा चर्चा सुरू आहे. कोर्टात कोणते मुद्दे मांडायचे, कोणते पुरावे द्यायचे आणि निवडणूक आयोगाने काय म्हटले यावरून दिल्लीत चर्चा सुरू आहे.

मोठी बातमी! अजित पवार गटाला ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह’ मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय

पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळेल, असे अजित पवार गटाला जाईल हे गृहीत धरून शरद पवार यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी ‘मी राष्ट्रवादी’ आणि ‘उगवता सूर्य’ या चिन्हाची आणि नावाची तयार केली होती. शरद पवार गटाने नवीन नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाकडे 120 चिन्हे शिल्लक होती, कोणते चिन्ह घ्यायचे यावर शरद पवारांच्या गटात चर्चा झाली, त्यानंतर उगवत्या सूर्याचे चिन्ह निवडणूक आयोगाकडे मागण्याची तयारी सुरू झाली आहे.

दिल्लीमधून सूत्र हलली, ठरलेला निकाल आला; शरद पवार गटाचा हल्लाबोल

follow us