Download App

आम्हीही मराठीच, पक्ष पळवण्याचा प्रश्नच नाही; अजितदादांचं सुळेंना प्रत्युत्तर

Ajit Pawar News : आम्ही सर्वजण मराठीच आहोत, त्यामुळे पक्ष पळवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना दिलं आहे. दरम्यान, मराठी माणसांचा पक्ष अदृश्य शक्ती पळवून नेत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर बोलतान अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी ते बोलत होते.

जरांगेंच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर देशव्यापी आंदोलनाचा एल्गार; मराठा महासंघाचा इशारा

अजित पवार म्हणाले, आम्ही सर्वजण मराठीच आहोत. पक्ष पळवायचा प्रश्नच येत नाही. कोणाला काय म्हणायचं म्हणू देत, आम्ही कामाचा विचार करणारी माणसं आहोत. केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्रात आणून, वयोवृद्ध आणि नव्या पिढीला सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणं हेचं आमचं काम असल्याचं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
हे अदृश्य शक्तीला यश आहे, आश्चर्यकारक निर्णय नाही. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे देशाच्या इतिसाहास पहिल्यांदा घडलं आहे. हे मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष आहे, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष तोही मराठी आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात अदृश्य शक्ती जे निर्णय घेते त्याचं हे आणखी एक उदाहरण. आमदारांच्या संख्येवरुन पक्ष ठरत नाही संघटना ठरवते संघटना पवारांसोबत असून आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

Raj Thackeray : …तेव्हा बांधकामासाठी टेंडर नव्हते; बाबरीची वीट मिळाल्यानंतर राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

follow us