Download App

‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही; EC चा निर्णय येताच अजितदादांनी आव्हाडांना सुनावलं

Ajit Pawar On Jitendra Awhad : ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सुनावलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर नूकताच निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं आहे. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना सुनावलं आहे.

शेअर बाजारासाठी मंगळवार ठरला ‘शुभ’, गुंतवणुकदारांच्या संपत्तीत चार लाख कोटींची वाढ

अजित पवार म्हणाले, निवडणूक आयोगानच्या निर्णयाचा नर्मपणे स्विकार करतो, मान्य करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर निवडणूक आयोगाकडून नूकताच निर्णय देण्यात आला आहे. कोणाच्याही आरोपांना उत्तर द्यायला मी बांधिल नाही. जी माणसं ‘ध’चा ‘मा’ करतात त्यांना उत्तर द्यायला मी बांधिल नाही, या शब्दांत अजित पवार यांनी सुनावलं आहे.

Pune News : धक्कादायक! तहसील कार्यालयातूनच ‘ईव्हीम’ कंट्रोल युनिट चोरले; गुन्हा दाखल

तसेच संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. उद्या निकाल त्यांच्या बाजूने निकाल असता तर आम्हीही सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो. आता सर्वोच्च न्यायालयात आम्ही चांगले वकील देऊन आमची भूमिका मांडणार आहोत. आमच्यासोबत 50 पेक्षा जास्त आमदार असून जास्तीतजास्त जिल्हाध्यक्षही कार्यकर्ते आहेत, बहुसंख्य जे लोकं असतात तेच पक्ष चालवतात, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.

Ahmednagar News : भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते, मराठा समाज आक्रमक

जयंत पाटलांवर प्रश्न विचारताच नो कमेंटस् :
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीक केली जात होती. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, जयंत पाटील यांना काय बोलायंच तो त्यांचा अधिकार त्याबद्दल नो कमेंटस् . विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलं असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

मुंबईकरांना दिलासा ते नमो महारोजगार मेळावे; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय!

दरम्यान, आम्ही सरकारमध्ये सामिल झालो तेव्हा आगामी निवडणुका महायुतीमधूनच लढवणार असल्याचं ठरलेलं आहे. त्याचवेळी जागावाटपाबाबतही चर्चा झाली. आता यातील काही महत्वाचा मुद्दा नसून आम्ही जागावाटपाबात अंतर्गत चर्चा करुन ठरवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us