Sanjay Raut : पुण्यातल्या गुंडांना राजकीय वरदहस्त? ‘तो’ फोटो पोस्ट करत राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर घणाघात…

Sanjay Raut : पुण्यातल्या गुंडांना राजकीय वरदहस्त? ‘तो’ फोटो पोस्ट करत राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर घणाघात…

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (ता.6 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ सोबतचा फोटो ट्विट केला. यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता-पुत्राकडून मिळतो का?, असा सवाल करत घणाघात केला आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांना रविवारी (ता.4 फेब्रुवारी) पुण्यातील कुख्यात गुन्हेगार हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर टीका होत असताना राऊतांकडून आणखी एक फोटो पोस्ट करत शिंदे पिता-पुत्राला धारेवर धरले गेले आहे.

खरचं नेहरूंनी 1959 मध्ये भारतीयांना ‘आळशी’ म्हटले होते?; मोदींनी ‘हायलाईट’ केलेल्या गोष्टीचं सत्य काय?

घायवळ हा पुण्यातल्या कुख्यात गुन्हेगारांपैकी एक आहे. तो एका गुन्हेगारी टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळीची चकमक पुण्यात घडली होती. यामध्ये दोन्ही टोळ्यांचे गुंड मारले गेले होते. कधीकाळी गजानन मारणे आणि निलेश गायवळ हे एकमेकांचे साथीदार होते. काही गुन्ह्यामध्ये सोबत देखील होते. त्या आरोपाखाली दोघांना शिक्षाही झाली होती. जेलमधून बाहेर पडल्यानंतर. गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात वाद झाला आणि दोघांमध्ये फाटाफूट झाली. यानंतर दोघांमध्ये टोळी युद्ध देखील रंगले होते. हे झालं घायवळ आणि मारणे यांच्यातील नातं. मात्र यांच्यासोबत असलेल्या फोटोवरून राऊतांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत आपल्या या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!
हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने..’ असं म्हणत राऊतांनी या ट्विटमध्ये अमित शाह यांच्या पासून राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टॅग केले आहे.

तूरडाळचा भडका… जेवणातून वरण गायब! पण नेमकी कारणे काय?

दरम्यान, उल्हासनगर मधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच पार्थ पवारांची गुंड मारणेची भेट त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतचा फोटो व्हायरल करत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता सत्ताधारी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येतं हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube