मुंबईकरांना दिलासा ते नमो महारोजगार मेळावे; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय!

मुंबईकरांना दिलासा ते नमो महारोजगार मेळावे; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय!

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक (Cabinet meeting) घण्यात आली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय!

मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही,राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार,ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार, राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार, उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार, मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार.

‘क्राईम अन् सस्पेन्स…”मर्डर मुबारक’चा धमाकेदार टीझर रिलीज! ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

मध उद्योगाला बळकटी, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी, बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार, शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी करणार, धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार, सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देणार, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता देणार, बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार,

‘हिशोब तर द्यावाच लागणार’; कथित खिचडी घोटाळ्यावरुन सोमय्या-राऊतांमध्ये धुमश्चक्री

कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता देणार, तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार, नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम लागू करणार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणारकृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष करण्यात येणार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय निर्माण करणार, गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद निर्माण करणार. हे मोठे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube