Download App

गळ्यात कांद्याची माळ घालत बैलगाडीत लंकेंचं आंदोलन; ‘दिशाभूल’चा ठपका ठेवत विखेंवर टीकास्त्र

दुध दरवाढीच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी लंके यांनी मंत्री विखे पाटलांवर सडकून टीका केलीयं.

Ahmednagar News : दुधाला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी गळ्यात कांद्याची माळ घालत गाई आणि म्हशींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांसह मोर्चा काढलायं. यावेळी निलेश लंके यांनी बैलगाडीतून आंदोलन करत गळ्यात कांद्याच्या माळा परिधान केल्या होत्या. यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार लंके यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांची काळजी असेल तर दुधाला हमीभाव दिला पाहिजे, दुध दराबाबत गृहमंत्र्यांना भेटून काय होणार? संबंधित मंत्र्यांची भेट घ्यावी, असा खोचक टोला निलेश लंके यांनी विखे पाटलांना लगावलायं.

लाडकी बहिण योजना म्हणजे दमडीचा सौदा अन् हेलपाटे चौदा; दानवेंची सरकारवर जोरदार टीका

यावेळी गाई, म्हशी यांच्यासह शेतकऱ्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळी व बैलगाडीवरून जिल्हाधिकारी कार्यालयवर आगेकूच केली. यावेळी गेटजवळच सर्व आंदोलकांना रोखण्यात आले. दुधाच्या दरावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, दूधाला चाळीस रुपये प्रति भाव मिळावा तसेच हे आमच्या हक्काचे आहे. गुजरातमध्ये प्रतिलिटर 40 ते 42 रुपये भाव मिळतोयं. शेतीप्रधान महाराष्ट्रातच दुधाच्या दराची अशी अवस्था असेल तर शेतकरी गप्प बसणार नसल्याचा इशारा निलेश लंके यांनी दिलायं.

पैठणीसह मराठमोळ्या साजामध्ये खुललं सईचं सौंदर्य, पाहा फोटो

दरम्यान, दुधाच्या दराबाबत मंत्री गोयल यांना आम्ही सुप्रिया सुळे यांच्यासह भेटलो. मंत्री विखे हे दुधाच्या प्रश्नासाठी गृहमंत्र्यांना भेटले मात्र लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याच्या दुधाला बाजार भाव मिळाला पाहिजे. आम्ही केवळ एवढ्या वरच न थांबता महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे देखील लाखो शेतकऱ्यांचे उपस्थितीमध्ये मोठ्या जनआंदोलन उभा करू, असा इशारा देखील यावेळी लंके यांनी सरकारला दिलायं.

ज्या ठिकाणी ट्रोल झाला, तेथेच ‘हार्दिक’वर कौतुकाचा वर्षाव; ‘वानखेडे’त चाहत्यांचं वेगळं रुप

दरम्यान, राज्यातील दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती डगमगली आहे. शिवाय दुधाला अपेक्षित असा दर नसल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन देखील राबविण्यात येत आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याकरिता दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव व शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. दुधाचे नवे दर दि. 1 जुलैपासून लागू होतील. याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केले.

follow us