Download App

ज्या ठिकाणी ट्रोल झाला, तेथेच ‘हार्दिक’वर कौतुकाचा वर्षाव; ‘वानखेडे’त चाहत्यांचं वेगळं रुप

ज्या वानखेडे स्टेडियमवर त्याला सर्वाधिक ट्रोल केलं गेलं तिथेच हार्दिक, हार्दिक नावाच्या घोषणा फॅन्सकडून दिल्या जात होत्या.

Victory Parade : टीम इंडियाचे खेळाडू विश्वचषकासह मुंबईत दाखल झाल्यानंतर (Victory Parade) मुंबईकरांनी या विजयवीरांचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत (Marine Drive) केलं. मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) गर्दीने खचाखच भरून गेलं होतं. टीम इंडियाच्या (Team India) रॅलीत तर हजारो क्रिकेटप्रेमींची गर्दी उसळली होती. हातात तिरंगा ध्वज अन् तोंडात टीम इंडियाचा घोष सोबत वंदे मातरमच्या घोषणाही असा काहीसा नजारा या रॅलीत दिसत होता.

या सगळ्या कल्लोळात एक गोष्ट उठून दिसत होती पण कुणाच्याही लक्षात आली नाही ती म्हणजे हार्दिक पांड्याला प्रोत्साहन (Hardik Pandya) देणाऱ्या घोषणा. याआधी क्रिकेट चाहत्यांत हार्दिक व्हिलनच ठरला होता. जागोजागी त्याल ट्रोल केले जात होते. पण, ज्या वानखेडे स्टेडियमवर त्याला सर्वाधिक ट्रोल केलं गेलं त्याच स्टेडियमवर हार्दिक, हार्दिक नावाच्या घोषणा फॅन्सकडून दिल्या जात होत्या.

यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबई संघाचा कर्णधार होता. पण, या स्पर्धेत मुंबईला विशेष काहीच करता आलं नाही. हार्दिकही सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता.

follow us

वेब स्टोरीज