अक्षय कुमार-प्रियदर्शन यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’ 15 मे ला थिएटर्समध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

तब्बल 14 वर्षांनंतर हॉरर-कॉमेडीचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकत्र ; हा रीयुनियन जबरदस्त मनोरंजनाची हमी देतो

  • Written By: Published:
Untitled Design   2026 01 08T111549.356

Horror comedy film ‘Bhoot Bangla’ is all set to hit the theatres on May 15th : ‘भूत बंगला’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर हॉरर-कॉमेडीचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकत्र येत आहेत आणि हा रीयुनियन जबरदस्त मनोरंजनाची हमी देतो. पहिल्या पोस्टरच्या लाँचपासूनच उत्सुकता प्रचंड वाढली होती, त्यातच आलेल्या इंटरेस्टिंग मोशन पोस्टरमुळे चित्रपटाविषयीचा बज आणखी वाढला. आता अखेर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली असून ही मच-अवेटेड हॉरर-कॉमेडी 15 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.

आज झालेल्या या मोठ्या घोषणेमुळे उत्साह आणखी वाढला आहे ‘भूत बंगला’ अधिकृतरीत्या 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. रिलीज डेट जाहीर होताच प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा परफेक्ट मिलाप तोही या जॉनरमधील उस्ताद प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांच्या जोडीसोबत म्हणजे प्रेक्षकांना हव्या असलेल्या सिनेमॅटिक जादूची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे.

रिलीज डेटची घोषणा करताना मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले

“बंगल्या मधून एक बातमी आली आहे!
15 मे 2026 ला उघडेल दरवाजा
थिएटर्समध्ये भेटूया #BhoothBangla”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Balaji Motion Pictures (@balajimotionpictures)

‘भूत बंगला’ला एक कंप्लीट एंटरटेनर बनवणारा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. यात अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, जिशु सेनगुप्ता, असरानी आणि वामिका गब्बी यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे काही भाग राजस्थान, जयपूर आणि हैदराबाद येथे शूट करण्यात आले आहेत, ज्यामुळे कथेला एक जबरदस्त व्हिज्युअल टच मिळतो. अनेक वर्षांनंतर प्रियदर्शन यांच्या चित्रपटात ही पॉवरहाऊस टीम एकत्र दिसणार असल्याने मनोरंजनाचा डोस प्रचंड असणार यात शंका नाही. याआधीही या टीमने अनेक क्लासिक कॉमेडी चित्रपट दिले आहेत, त्यामुळे आता ‘भूत बंगला’मध्ये ही मस्ती आणि धमाल किती जबरदस्त असेल याची कल्पना करा!

प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’चे निर्मितीकार्य शोभा कपूर, एकता आर. कपूर आणि अक्षय कुमार यांच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या बॅनरखाली झाले आहे. फारा शेख आणि वेदांत बाली सहनिर्माते आहेत. कथा आकाश ए. कौशिक यांनी लिहिली असून स्क्रीनप्ले रोहन शंकर, अभिलाष नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केला आहे. डायलॉग्स रोहन शंकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची निर्मिती एकता कपूर यांच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

follow us