Hardik Pandya : वासे फिरले! घटस्फोट होताच पोटगी म्हणून ‘हार्दिक’ देणार इतकी संपत्ती

  • Written By: Published:
Hardik Pandya : वासे फिरले! घटस्फोट होताच पोटगी म्हणून ‘हार्दिक’ देणार इतकी संपत्ती

Hardik Pandya 70% Property will be transferred to Natasa Stankovic : हार्दिक पांड्या आणि त्याची सर्बियन पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील नात्यात सर्व काही ठीक नसल्याच्या अफवा आहेत. दोघे वेगळे होऊ शकतात अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. या सर्व चर्चामध्ये या दोघांनी घटस्फोट घेतल्यास हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) त्याच्या एकूण संपत्तीच्या 70 टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागण्याची शक्यता आहे.

Natasa Stankovic Love Story : डीजे वाले बाबूवर डान्स करताना जुळले हार्दिक-नताशाचे सूर अन् ताल

कशी झाली घटस्फोटांच्या चर्चेला सुरूवात?

हार्दिक आणि नाशात्या यांच्या अद्याप घटस्फोट झाला आहे की याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा नेमकी कशी सुरू झाली असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर, या चर्चेला सुरूवात सगळ्या पहिले नताशाने तिच्या इंस्टाग्राम बायोमधून ‘पंड्या’ हे आडनाव काढून टाकल्यानंर झाली. त्यानंतर पूर्वी नताशा क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात हार्दिकला चिअर करण्यासाठी येत असे. परंतु, अलीकडील काळात ती स्टेडिअममध्ये आलेली नाही. या दोन घटनांमुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उत आला आहे.

हार्दिक गुजरातकडून अन् रोहित मुंबईकडूनच खेळणार! पहा रिलीज अन् रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

2020 मध्ये पार पडले होते लग्न

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा विवाह मे 2020 मध्ये मोठ्या धूमधडाक्यात पार पडले होते. त्यानंतर नताशाने जुलै 2020 मध्ये अगस्त्यला जन्म दिला. यानंतर या दोघांनी पुन्हा 2023 मध्ये उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केले. या लग्नाचीदेखील जोरदार चर्चा सोशल मीडियात रंगली होती.

…म्हणून हार्दिक मुंबईच्या संघाच गेला

जर नताशा आणि हार्दिक पंड्याचा घटस्फोट झाला तर, हार्दीकला त्याच्या संपत्तीच्या 70 टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागू शकतो. ही रक्कम उभी करण्यासाठीच हार्दीक मुंबई इंडियन्सच्या संघात गेल्याची चर्चा आहे. यात किती तथ्य आहे याबाबत ठोस सांगणे आतातरी कठीण आहे.

हार्दिकची संपत्ती किती?

पांड्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. यासाठी त्याला संघाकडून फी म्हणून 15 कोटी रुपये दिले जातात.  याशिवाय पांड्याने मुंबईत एक अपार्टमेंट 30 कोटींना विकत घेतली आहे. तसेच वडोदरा येथे करोडो रूपयांचे पेंटहाऊस आहे. हार्दिकला विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून सुमारे 55-60 लाख रुपये कमाई होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज