Natasa Stankovic Love Story : ‘डीजे वाले बाबू’ वर डान्स करताना जुळले हार्दिक-नताशाचे सूर अन् ताल

Natasa Stankovic Love Story : ‘डीजे वाले बाबू’ वर डान्स करताना जुळले हार्दिक-नताशाचे सूर अन् ताल

Natasa Stankovic Love Story: क्रिकेटपटू आणि सिनेमासृष्टीतील तारका यांच्या अनेक लव्हस्टोरी आहेत. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारका यांच्या लव्हस्टोरी काही नवीन नाहीत. परंतु या सर्वांत क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सर्बियन अभिनेत्री नताशा (Natasa Stankovic) यांची लव्हस्टोरी थोडी वेगळीच आहे.

हार्दिक आणि नताशा जोडी प्रेम प्रकरणामुळे खूपच चर्चेत असतात. हार्दिकने जानेवारी २०२० मध्ये अभिनेत्री नताशा स्टेनकोविचबरोबर साखरपुडा करत असताना चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला होता. त्यानंतर काही महिन्यानंतर ३१ मे २०२० मध्ये ते लग्नबंधनात अडकले. हार्दिक आणि नताशाची पहिली ओळख ही एका नाईट क्लबमध्ये झाली होती.

यावर म्हणाला एका नाईट क्लबमध्ये आमची पहिली भेट झाली होती. तिला माहिती नव्हतं की मी कोण आहे? एकमेकांशी बोलत असताना भेटीचे रुपांतर हे ओळखीमध्ये झाले होते. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मी हॅट घातली होती. परंतु रात्री १ वाजता हॅट घालून, गळ्यामध्ये चैन आणि हातात घड्याळ घालून बसलो होतो. तेव्हा तिला मी थोडास विचित्र वाटलो. परंतु आम्ही आमची चर्चा ही सुरूच होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही दोघे एकमेकांना ओळखू लागलो आणि डेट करणं सुरु केलं, असं हार्दिक पांड्याने सांगितले.

वर्ष २०२० च्या न्यू ईयर पार्टीमध्ये हार्दिकने नताशाला एका हटके अंदाजामध्ये प्रपोज केले होते. तसेच अंगठी घालत त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. या आनंदी क्षणांचा एक व्हिडीओ देखील हार्दिक पांड्याने शेअर करत लिहिले आहे की, “मे तेरा तू मेरी, जाने सारा हिंदुस्तान”. या पोस्टनंतर चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. हार्दिकने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले आहे की, “माझ्या आई वडिलांना माहिती नव्हतं की मी नताशाबरोबर साखरपुडा करणार आहे.

ऐन वर्ल्डकपपूर्वी कपिल देवचे हार्दिक पांड्याविषयी मोठे वक्तव्य; म्हणाले, तो…

इतकंच काय तर माझा भाऊ कृणाल पांडाला मी २ दिवसाअगोदर याविषयी सांगितले होते. २०२० च्या लॉकडाऊनमध्ये हार्दिक आणि नताशाने लग्न केलं आणि ३१ मे २०२० दिवशी आपल्या चाहत्यांना याची खूशखबर दिली होती. ३० जुलै २०२० रोजी नताशाने छोट्याशा पाहुण्याला जन्म दिला. या बाळाचे नाव अगस्त्य ठेवले आहे. हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत ११ कसोटी, ७१ एकदिवसीय, ८७ एकदिवसीय आणि १०७ आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत १ शतकासह ५३२ धावा, वनडेत ९ अर्धशतकांसह १५१८ धावा, टी २० तीन अर्धशतकांसह १२७१ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कसोटीत १७, वनडेत ६८आणि टी २०, तर ६९ गडी बाद केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube