Pathardi Flood Ahilyanagar Heavy Rain : दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. थेट घरांमध्ये पाणी शिरलं असून संसार उपयोगी वस्तू या थेट रस्त्यावरती आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. आज खासदार निलेश लंके आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत धीर देण्याचे काम केले.
यावेळी बोलताना निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले की, मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून घर, रस्ते हे वाहून गेल्या असल्याने मोठं नुकसान झालंय. शासनाने केवळ आता पाहणी करून रेकॉर्ड तयार करून ठेवलं आहे. तातडीने या नुकसानग्रस्त नागरिकांना मदत जाहीर करावी. दोन दिवस शासनाकडून या ठिकाणाची पाहणी केली जाते. त्यानंतर कुठलेही ठोस पाऊल उचलले (Pathardi Flood) जात नाही. यामुळे शासनाने केवळ पाहणी न करता तातडीने या ठिकाणी मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे.
तसेच यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) म्हणाले की, करंजी भागांमध्ये ( Ahilyanagar) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. नागरिकांचे घरं, दुचाकी वाहने, चार चाकी वाहने, संसार उपयोगी वस्तू हे वाहून गेलेले आहेत. झालेलं नुकसान पाहता शासनाने इंडिया रेपचे निकष बाजूला ठेवत तातडीने या नुकसानग्रस्त नागरिकांना मदत दिली पाहिजे. या घटनेमध्ये आम्हाला राजकारण करायचे नाही. मात्र, निवडणुकीपूर्वी यांनी जे एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवत मदत केली जाईल, अशी आश्वासन दिली होती. त्याचप्रमाणे या यावेळी विशेष केसमध्ये या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत केली जावी, अशी मागणी यावेळी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्या या दुथडी भरून वाहत होत्या. तसेच या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. संसार उपयोगी वस्तू, गाई, म्हशी, जनावरे ही अक्षरशः वाहून गेली. तसेच अनेक ठिकाणी रस्ते हे खचल्याने वाहनधारकांना देखील इजा करण्यास अडचणी निर्माण झाल्या. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या ठिकाणी भेट देत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. झालेले नुकसानीबाबत नागरिकांनी थेट मंत्री, खासदारांसमोरच आपली आपबीती सांगितली. यावेळी शासनाकडून लवकरात लवकर मदत जाहीर केली जाईल. तसेच शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, अशी देखील माहिती यावेळी उपस्थित नेते मंडळींनी दिली.