Download App

लाडकी बहिण योजना म्हणजे दमडीचा सौदा अन् हेलपाटे चौदा; दानवेंची सरकारवर जोरदार टीका

Ambadas Danve हे विधान परिषदेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरील (Budget) चर्चेदरम्यान बोलत होते.

Ambadas Danve Criticize Maharshtra Government on Ladaki Bahin Yojana : ग्रामीण भागातील म्हणी प्रमाणे हे सरकार (Maharshtra Government) म्हणजे खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी स्थिती आहे. तर लाडकी बहिण योजनेवर (Ladaki Bahin Yojana) बोलताना ते म्हणाले ही योजना महिलांसाठी दमडीचा सौदा अन् हेलपाटे चौदा अशी स्थिती असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. ते विधान परिषदेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरील (Budget) चर्चेदरम्यान बोलत होते.

बोलणी फिस्कटली, निवडणूक लागली… : 12 जुलैला विधानपरिषदेचे धूमशान

यावर बोलताना अंबादास दानवे म्हटले की, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. राज्यावर कर्ज असताना केलेल्या भरमसाट घोषणा म्हणजे तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा अशी स्थिती असल्याची टीका दानवे यांनी तुकाराम महाजांच्या ओवीचा दाखल देत केली. हा अर्थसंकल्प केवळ चार महिनेच आपण सत्तेत राहणार पुन्हा येणार नाही या मानसिकतेतून मांडला आहे. तर यावेळी दानवे यांनी एका कवितेच्या माध्यमातून अर्थसंकल्पावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री लाढकी बहीण योजना निवडणुकीपर्यंतच; पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

पुढे दानवे म्हणाले की, हा फेक अर्थसंकल्प आहे. तर सरकार केवळ होर्डिंग्ज आणि जाहिराती करण्यामध्ये मग्न आहे. हे सरकार केवळ अदानी अंबानींसाठी सिमेंटचं जंगल उभं करू शकतं मात्र जनतेचा विकास करू शकत नाही. ग्रामीण भागातील म्हणी प्रमाणे हे सरकार म्हणजे खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी स्थिती असल्याची टीका दानवे यांनी अर्थसंकल्पावरून केली आहे.

तर लाडकी बहिण योजनेवर बोलताना दानवे म्हणाले, सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना ही कॉपी केलेली योजना आणली आहे. त्याच योजनेमुळे मध्यप्रदेशात भाजप निवडून आलं आहे. असं म्हणतात मात्र तेथील मुख्यमंत्र्यांना घरी बसावं लागलं आहे. ही योजना चांगली आहे. मात्र ती योग्य राबवली जाणार का? कारण यासाठी केलेली तरतुद केवळ 6 महिने पुरेल एवढीच आहे. तर ही योजना म्हणजे महिलांना रोज रांगेत उभे रहावे लागत असल्याने दमडीचा सौदा अन् हेलपाटे चौदा अशी आहे. अशी टीका दानवे यांनी केली.

follow us