School Time : बच्चे कंपनींसाठी गुड न्यूज! आता सकाळच्या साखर झोपेत ‘नो डिस्टर्बन्स’; केसरकरांची मोठी घोषणा

School Time : सकाळची साखर झोप कुणाला आवडत नाही. मात्र लहान मुलांना शाळांच्या वेळांमुळे (School Time) या सकाळच्या साखर झोपेचा आनंदच घेता येत नव्हता. मात्र आता त्यांचं हे म्हणणं शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी ऐकलं आहे. आता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळांची वेळ आता सकाळी लवकर नसणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र […]

School Time

School Time : सकाळची साखर झोप कुणाला आवडत नाही. मात्र लहान मुलांना शाळांच्या वेळांमुळे (School Time) या सकाळच्या साखर झोपेचा आनंदच घेता येत नव्हता. मात्र आता त्यांचं हे म्हणणं शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी ऐकलं आहे. आता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळांची वेळ आता सकाळी लवकर नसणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र शाळांच्या वेळांमुळे या झोपेमध्ये व्यत्यय येत होता. परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता सकाळच्या साखर झोपेत ‘नो डिस्टर्बन्स’…

बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळी लवकर किंवा लवकर शाळेची वेळ असल्यामुळे पहाटे लहान मुलांना उठावं लागत. त्यामुळे लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने लहान मुलांच्या शाळेची वेळ बदलण्यात यावी. अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानंतर येथे शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळांची वेळ सकाळी नऊ नंतरच ठेवण्यात येईल. अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळात केली.

Fighter: ‘बँग बँग ते फायटर’ सिद्धार्थ आनंद अन् हृतिक रोशनचा तिसरा प्रोजेक्ट ठरणार !

दरम्यान महाराष्ट्र मध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. तर माध्यमिक शाळांच्या वर्ग दुपारी भारतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय बारा वर्षांचे पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय तीन ते दहा वर्षांच्या आत असतं. त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात. अशा सूचना शिक्षण तज्ञांकडून येत होत्या. या निर्णयामुळे आता लहान मुलांच्या पालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Uddhav Thackeray : ‘युतीचं महत्व शिका, मोदींसमोर कोण याचं उत्तर द्या’; ठाकरे गटाने टोचले काँग्रेसचे कान

तसेच लहान मुलांच्या झोपेबाबत मनोवैज्ञानिक त्याचबरोबर बालरोग तज्ञ देखील सांगतात की, बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांचे झोप पूर्ण होत नाही. परिणामी त्यांच्या आरोग्यावर विविध परिणाम होत. असल्याचा अहवाल देखील लवकरच येणार आहे. यासाठी सरकारने एक मनोवैज्ञानिक आणि बालरोग तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.

यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आम्ही पूर्व प्राथमिक शाळांचे शाळांचे धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार लहान मुलांना लवकर उठवणे योग्य नाही. कारण लवकर उठल्यास त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळाली पाहिजे. यासाठी त्यांचा टाइमिंग निश्चित करण्यात आला आहे. हे संदर्भात पिडियाट्रीक असोसिएशन ऑफ इंडिया, बाल मनो वैज्ञानिक यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी सुचवलेल्या सूचनांनुसारच शाळांचे वेळ निश्चित केले जाणार आहेत. कारण कोणत्याही मुलांना पुरेशी झोप आणि शिक्षण मिळणं हा त्यांचा हक्क आहे. असं केसरकर म्हणाले.

Exit mobile version