Download App

ब्रेकिंग! पक्षविरोधी वक्तव्य भोवलं; सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी

  • Written By: Last Updated:

Sudhakar Badgujar expelled from Thackeray’s  Party : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु झाल्या आहेत. पक्षविरोधी विधान करणं बडगुजरांच्या चांगलचं अंगलट आले असून, राऊत आणि ठाकरेंच्या आदेशानंतर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी सांगितले. काल (दि.3) सुधाकर बडगुजर यांनी विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा दावा केला होता.

IPL 2025 : विराट कोहली अन् ’18’ चं कनेक्शन! विराटने स्वत:चं सांगितलं मोठं सिक्रेट, जर्सी अन्…

पक्षात नाराज असल्याच्या चर्चा

सुधाकर बडगुजर गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा ठाकरे गटात सुरू होत्या. ते भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर बडगुजर यांनी म्हटलं होतं की, मीच नाही. कमीत कमी संघटनेतील (Shiv Sena) दहा-बारा लोकं नाराज आहेत. संघटानात्मक बदल झाल्यापासून ते अस्वस्थता आहेत. हे वरिष्ठांच्या कानावर ते मी वेळोवेळी घातले आहे. यात सुधारणा करावी, अशी मागणी देखील केली होती.

पक्ष सोडून जाण्याची भूमिका

अपेक्षित पद मिळालं नाही, त्यामुळे विलास शिंदे नाराज आहेत. तर माझी नाराजी कोणावरच नाही, मी स्वत: नाराज आहे. पक्ष सोडून जाण्याची स्पष्ट भूमिका अजून कोणत्याही शिवसैनिकाने घेतलेली दिसत नाही, परंतु येणारा काळच सांगेल काय असेल ते…असंही सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं होतं.

‘जेलमध्ये आरोपींकडे 300 कोटींची मागणी’, हगवणे प्रकरणातील सुपेकरांबाबत धसांचा गौप्यस्फोट

आज शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होते.  या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. त्यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.  महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते, तर विलास शिंदे मात्र उपस्थित होते.

हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया

पक्षात नाराजी व्यक्त करणे, गुन्हा नाही. पक्षाने केलेल्या कारवाईचं मी योग्य वेळी उत्तर देईन. माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मी नाशिकशहराबाहेर असल्यामुळे पक्षाच्या पत्रकार परिषदेला जावू शकलो नाही. जिल्हा प्रमुखांना कळवलं होतं. हकालपट्टी केल्याचा निर्णय पक्षाचा आहे. यावर मी योग्य वेळी निर्णय देईल. पुढील भूमिका देखील वेळ आल्यावर सांगेल, आधी कोणतीही कुणकुण लागली नव्हती. संधी दिली असती तर पक्षप्रमुखांना भेटलो असतो, आता हकालपट्टी झाल्यावर त्यांना भेटण्याचा विषयच येत नाही. इतरही नाराज होते, पक्षाने अचानक निर्णय घेतला. हा एकतर्फी झालेला निर्णय आहे, असं सुधाकर बडगुजर यांनी हकालपट्टीनंतर म्हटलं आहे.

राऊतांनी सुनावले खडेबोल 

संजय राऊत यांनी म्हटलंय की, कोणी फडणवीस यांना भेटलं, मोदींना भेटलं किंवा त्याच्यामुळे नाराजी आहे. मुख्यमंत्री आहेत. या राज्याचे महानगरपालिकेच्या काही संदर्भात भेटले असतील. भेटावसं वाटलं असेल, आम्ही भेटत नाही. आमच्यासारखे लोक किंवा कडवट शिवसैनिक टाळतात. त्याच्यामुळे आपल्या सहकाऱ्यांमध्ये गोंधळ होईल, संशयास्पद वातावरण निर्माण होईल, अशा भेटी टाळायच्या असतात. जेणेकरून आपल्याबद्दल संशय निर्माण होईल आणि कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरुद्ध कोणी कायदा आणलेला नाही. नाशिकमध्ये मीडियातून ज्या बातम्या येत आहेत, तसे नाही. एखाद दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे, व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्याची प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते. ठीक आहे, आज पक्ष अडचणीत आहे. लोकांना लाभ हवे आहेत, त्या लाभासाठी लोकं पक्ष बदलत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

follow us