Download App

डॉ. सुरेश पठारे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान…

बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत आशिया खंडातून प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्सच्यावतीने स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील मानवाधिकार कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. सुरेश पठारे यांनी आशिया पॅसिफिक खंडातून प्रतिनिधित्व केलं आहे.

काही काळबेरं केलं नसेल तर घाबरताय कशाला, संजय शिरसाटांचा विरोधकांना सवाल

सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर महत्वपूर्ण प्रश्नांवर धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रासह इतर आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्न होण्यासाठी या आंतरराष्ट्रीय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

तीन दिवस चाललेल्या या बैठकीत जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, मानवाधिकार आयुक्त कार्यालय आणि युनायटेड नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सोशल डेव्हलपमेंटच्या अधिकार्‍यांसोबत जगभरातून आलेल्या प्रतिनिधींच्या विविध बैठका पार पडल्या.

दोषारोपपत्र मागे घेण्यासाठी पंकजा मुंडेंची खंडपीठात धाव, नेमकं प्रकरणं तरी काय?

डॉ. सुरेश पठारे यांची समाजकार्य शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि सामाजिक संधोधनाची कौशल्य, ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न हाताळणीतील प्रदीर्घ अनुभवामुळे या बैठकीसाठी आशिया खंडाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. पठारे यांनी उच्चस्तरीय चर्चा आणि धोरणात्मक चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

बचत गट महिला समृध्दी कर्ज योजना 2023

या बैठकीत आपली भूमिका मांडताना डॉ. पठारे म्हणाले, शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी भारताची “वसुधैव कुटुंबकम्” ही संकल्पना संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक असून यासाठी समाजकार्यकर्ते कटिबद्ध आहेत. भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशामध्ये ७०० पेक्षा अधिक समाजकार्य महाविद्यालय आहेत.

नगरकरांना दहशत अन् गुंडगिरीच्या जाचातून मुक्त करा; भाजपच्या पदाधिकाऱ्याची थेट फडणवीसांकडे मागणी

समाजकार्य महाविद्यालयातील समाजकार्याचे शास्त्रीय ज्ञान असणारे प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थी अशा मनुष्यबळाची संख्या मोठ्या प्रमाणात असून जागतिक पातळीवर शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघासोबत प्रत्यक्ष नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प राबविले जाऊ शकतात. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाच्या धोरणनिर्मितीसाठी तसेच जागतिक समस्या हाताळण्यासाठी सामाजिक काम करणाऱ्यांना सहभागी करून घ्यावं, असं आवाहन डॉ. पठारे यांनी केलं आहे.

दरम्यान, डॉ. पठारे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचा सहभाग शाश्वत सामाजिक विकासाला चालना देणारी धोरणे आणि उपक्रमांना आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वासही समाजकार्य क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us