प्रतिनिधी : प्रशांत गोडसे
Maharashtra Assembly Winter Session : नागपूर येथे सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. महायुतीचं सरकार राज्यात दुसऱ्यांदा स्थापन झाले असून मात्र अद्याप महायुतीमध्ये (Mahayuti) खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. तर दुसरीकडे यंदा हिवाळी अधिवेश विरोधी पक्षनेते विना होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जर हिवाळी अधिवेश विरोधी पक्षनेते विना झाला तर महायुतीसमोर महाविकास आघाडीचा टिकावं लागेल का याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
05 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला असून अद्याप उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. माहितीनुसार, रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महसूल, गृह आणि नगरविकास खात्यावर अडून आहेत. तर शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न भाजपाकडून केली जात आहे.
खाते वाटपावरून धुसफूस सुरु असताना नागपूर येथे आठ दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवार पासून सुरु होत आहे. महायुती सरकारचं पहिल अधिवेशन असल्याने महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे तर महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेतेपद घेता येईल इतके जागा देखील न मिळाल्याने हिवाळी अधिवेश विरोधी पक्षनेत्या विना होणार असल्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात राज्यपाल अभिभाषण, अंतिम आठवडा, पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि औचित्याचे मुद्द्यांवर कामकाज होईल तर राज्यात उडालेला कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, परभणीमधील हिंसाचार, बेस्ट बस अपघातावरून विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहे.
एका आठवड्याच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीची विटंबनामुळे परभणीत उसळलेला हिंसाचार आणि आंबेडकरी अनुयायींवर पोलिसांनी केलेली कारवाई, बीड जिल्ह्यात सरपंचांची झालेली हत्या, कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातानंतर कंत्राटी कामकार भरतीवर निर्माण झालेला प्रश्न, शेतकऱ्यांना जाहीर कर्जमाफी, वाढीव कृषीवीज बिलाचा मुद्दा यावरून सरकारला विरोधक घेरणार.
… तर आज मी अभिनेत्री नसते, ‘बंदिश बँडिट्स’ फेम श्रेया चौधरीने केला खुलासा
विरोधी पक्षनेतेपदी कोण?
विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा चर्चेत आला होता. विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेने (ठाकरे) गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी सकारात्मकता दर्शवली होती. दरम्यान, अजूनही विरोधकांकडून प्रस्ताव गेलेला नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीतील घटक पक्षांत वाद असल्याने विरोधी पक्षनेते पदी कोणाची वर्णी लागणार हे पहाणे महत्वाचे असणार आहे.