‘सुदृढ अन् उदंड आयुष्य लाभो…’; DCM एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपणास सुदृढ व उदंड आयुष्य लाभो अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Sharad Pawar

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज (गुरुवारी 12 डिसेंबर) रोजी 85वा वाढदिवस आहे. यानिमित्त शरद पवारांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही ट्विट करून  पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘संविधाना’च्या प्रतिकृतीची विटंबना; अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी समाज आक्रमक… 

आपणास सुदृढ व उदंड आयुष्य लाभो अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात दिग्गज नेते म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. भारतातील सर्वाधिक संसदीय कारकीर्द असलेले नेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. 50 वर्षांहून अधिक काळ ते राजकारणात सक्रिय आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवार यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात की, महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांना मी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपणास सुदृढ व उदंड आयुष्य लाभो अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Preity Zinta: प्रीती झिंटाचा ग्लॅम लूक; पाहा खास फोटो! 

अजित पवार काय म्हणाले?

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम स्वास्थ आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा असं अजितदादांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींकडून पवारांना शुभेच्छा

दरम्यान, शरद पवार यांच्या दिल्लीतील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला. केक कापल्यानंतर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने खासदार निलेश लंके यांना त्याच तलवारीने केक भरवला. या व्हिडिओची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली.

Exit mobile version