‘संविधाना’च्या प्रतिकृतीची विटंबना; अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी समाज आक्रमक…
Ahmednagar News : परभणीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडलीयं. या प्रकरणावरुन संतप्त आंबेडकरी अनुयायांच्यावतीने परभणीत आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून पोलिसांवरच दगडफेक करण्यात आल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी समाजाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आलीयं. यावेळी घटनेचा निषेध करुन आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त आंबेडकरी समाजाच्यावतीने करण्यात आलीयं.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गृहखात्यासाठी आग्रही, भाजप नेत्यांची दिल्ली दरबारी खलबतं
परभणीमध्ये एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलीयं. या घटनेनंतर परभणीतील आंबेडकरी अनुयायांनी या माथेफिरुला ताब्यात घेत चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. घटनेच्या दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देऊन बंद पाळण्यात आला. याच दिवशी आंबेडकरी अनुयायांकडून निदर्शनेही करण्यात आले. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून संतप्त जमावाने भर रस्त्यात टायर जाळून निषेध व्यक्त केलायं. तर दुकानांचीही तोडफोड करुन पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केलीयं.
‘आरोपांना कायदेशीर आधार नाही, केवळ पराभूत झाल्याने…’, EVM च्या मुद्द्यावरून निकमांचा मविआवर निशाणा
या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून शांतता राखण्याचं आवाहन आंबेडकरी समाजाला केलं जात असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही या घटनेची दखल घेत आरोपीला 24 तासांत अटक करण्याची मागणी केलीयं, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा सरकारला दिलायं. त्यामुळे आता राज्यभरात आंबेडकरी समाजाकडून आंदोलने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच अहिल्यानगरमध्येही आंबेडकरी समाजाकडून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलायं.
BJPचं ऑपरेशन कमळ; महाविकास आघाडीचे काही खासदार संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
डॉ. आंबेडकरांच्या पुतळा परिसरात पोलिसाची नेमणूक करा – बनसोडे
परभणी येथे घडलेल्या घटनेचा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने व पक्ष संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच बांगलादेशातील बौद्ध भिख्खू यांच्यावरील हल्ल्याचे देखील निषेध करण्यात आलायं. परभणीत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करून देशद्रोहचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच सर्व आंबेडकरी समाजाच्यावतीने महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक पोलीस नेमण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे यांनी केलीयं.
यावेळी आंबेडकरी समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, सुनील साळवे, सुनील शिंदे, किरण दाभाडे, महेश भोसले, अमित काळे, संजय जगताप, आदीसह आंबेडकर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.