‘आरोपांना कायदेशीर आधार नाही, केवळ पराभूत झाल्याने…’, EVM च्या मुद्द्यावरून निकमांचा मविआवर निशाणा
Ujjwal Nikam : विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) प्रचंड मोठा विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठ्या पराभावला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर मविआने ईव्हीएम (EVM) वर शंका घेतली. अनेक ठिकाणी ईव्हीएच्या विरोधात आंदोलने देखील केली. इतकेच नाही तर बॅलेट पेपरवर (Ballot paper) निवडणुका घेण्याची आग्रही भूमिका मविआने घेतली. यावरून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी विरोधकांचे कान टोचलेत.
नव्या वर्षात दाढी करणं अन् केस कापणं महागात पडणार; सलून संघटनेचा दरवाढीचा निर्णय
उज्जल निकम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी ईव्हीएममध्ये छेडछाड करून सत्ताधारी पक्षाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, असा आरोप महाविकास आघाडीकडून होतोय. मविआने न्यायालयीन लढाई लढण्याची तयारीही केलीय, याविषयी निकम यांनी विचारले असता ते म्हणाले की, संपूर्ण जगात भारतात लोकशाही प्रबळ आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. पण, माझ्या मते याला कायदेशीर आधार नाही. कारण ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक आयोगाने यापूर्वीही काही विशेष चाचण्या केल्या होत्या, असं निकम म्हणाले.
AUSW vs INDW: स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, झळकावले शानदार शतक
पुढं ते म्हणाले, आयोगाने ज्या चाचण्या केल्या होत्या, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर त्या ठेवल्या होत्या. त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. आता तुम्ही महाराष्ट्रात पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने याचे भांडवल करणे, सामान्य जनतेची दिशाभूल करणे, हे लोकशाहीत योग्य नाही, असं उज्जव निकम म्हणाले.
ते म्हणाले, ते या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयात त्यांना प्रथमत: प्राथमिक पुरावे द्यावे लागतील. ईव्हीएममध्ये कशाप्रकारे छेडछाड झाली, हे जर त्यांना दाखवायचे असेल तर प्रमाणभूत आधार द्यावा लागेल. उगीच आमचा अंदाज आहे, आमचा संशय आहे, असे दावे करून संशयाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात काहीही टिकू शकत नाही, असं निकम म्हणाले.
लोकसभेत निकमांचा पराभव…
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वकील उज्ज्वल निकम यांनी मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचे आव्हान होते. या निकराच्या लढतीत वर्षा गायकवाड विजयी झाल्या. निकालाच्या दिवशी, निकम यांच्याकडून विजयाची अपेक्षा होती कारण त्यांनी सुरुवातीच्या फेरीत मोठी आघाडी घेतली होती. मात्र, अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये गायकवाड यांनी निकम यांची आघाडी मोडून काढली.