AUSW vs INDW: ​​स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, झळकावले शानदार शतक

  • Written By: Published:
AUSW vs INDW: ​​स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, झळकावले शानदार शतक

AUSW vs INDW: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये सुरु असणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी करत शकत झळकावले आहे. स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) वनडे क्रिकेटमधील नववे शतक झळकावले आहे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक होते.

स्मृती मानधनाने इतिहास रचला

स्मृती मंधानाने 2024 मध्ये आतापर्यंत चार शतक झळकावले आहे. यासह महिला वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 4 शतके झळकावणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. या सामन्यात मंधानाने 103 चेंडूत शतक पूर्ण केले आणि यादरम्यान तिने एक षटकार आणि 13 चौकारही ठोकले. स्मृती मानधनाने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात 109 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 105 धावा केल्या. गार्डनरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

तर दुसरीकडे सात वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आपले वर्चस्व कायम राखत आहे. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात खराब कामगिरी केली आहे.

धक्कादायक, साताऱ्यात जामिनासाठी न्यायाधीशांनीच घेतली 5 लाखांची लाच, गुन्हा दाखल

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये सुरु असणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमावून 298 धावा केल्या. ॲनाबेल सदरलँडने 95 चेंडूत 110 धावांची शानदार खेळी केली. भारताकडून अरुंधती रेड्डीने सर्वाधिक 4 बळी घेतले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube