शरद पवारांना भेटल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Ajit Pawar First Reaction After Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शरद पवार यांनी आता 85 व्या वर्षात पदार्पण केलंय. यानिमित्त शरद पवारांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना ‘एक्स’ हँडलवर एक खास ट्विट करत वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार यांना 84 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Sharad Pawar Birthday News ) देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते. अजित पवारांसोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ देखील होते. शरद पवार अन् अजित पवार यांच्यामध्ये तब्बल 35 मिनिटं चर्चा झाल्याचं समोर (Maharashtra Politics) आलंय. या भेटीनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांशी नेमकी काय चर्चा झाली, यावर भाष्य केलंय. अजित पवार म्हणाले की, आम्ही इन जनरल विषयांवर चर्चा केली. चहा नाश्ता करून तेथून निघालो. शरद पवार यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गृहखात्यासाठी आग्रही, भाजप नेत्यांची दिल्ली दरबारी खलबतं
राज्यात सध्या काय सुरू आहे, यावर चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली यावर देखील चर्चा झाली. अधिवेशन केव्हा, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कामकाजासाठी मंत्रिमंडळाची आवश्यकता असते यावर देखील चर्चा झालीय. 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असं अजित पवार माध्यमांना म्हणाले आहेत. तर आज 12 डिसेंबर रोजी साहेबांचा वाढदिवस असून सर्वजण त्यांना भेटतात. त्यांचं दर्शन घेवून शुभेच्छा देखील देतात. आम्ही त्यासाठीच आलो होतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय.