Ramdas Athawale Reaction On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालं नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासंदर्भात फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत शक्य तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची (Ramdas Athawale) प्रतिक्रिया समोर आलीय.
विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे की तुम्ही आता हे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर वार
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये घेतलं (Maharashtra Politics) जाईल, ही चर्चा सुरू आहे. यानंतर नाशिकमध्ये रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांना महायुतीत घेवून फायदा नाही. राज ठाकरेंची या निवडणुकीत गेलेली आहे. ते विधानसभा निवडणुकीत 143 जागा लढले. माझ्याशिवाय सरकार येणार नाही, या स्वप्नात राज ठाकरे राहिले. पण त्यांचं स्वप्न भंग झालं असल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, माझ्या सभांना एवढी गर्दी होते पण मतं मिळत नाहीत. तसीच गर्दी राज ठाकरे यांच्या सभेला होतात. त्यांच्या मोठ्या सभा होतात. लोकं ऐकायला येतात अन् निघून (Ramdas Athawale Reaction On Raj Thackeray) जातात. पण मतं देण्यासाठी त्यांच्यासोबत लोक राहत नाही, असं आठवले म्हणाले आहेत. राज ठाकरे हे महायुतीममध्ये येतील, असं वाटत नसल्याचं आठवले म्हणाले आहेत. तसेच यापुढे काय निर्णय होईल, हे माहिती नसल्याचं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांची विशेष हार्डलाईन आहे. त्यामुळे त्यांचा विशेष फायदा महायुतीला होणार नाही. मी महायुतीसोबत आहे, तेव्हा राज ठाकरे यांची आवश्यकता काय? असा देखील सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांचा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये फायदा होवू शकतो. परंतु काही ठिकाणी थोड्या फार प्रमाणात फायदा होवू शकतो. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यासंदर्भात निर्णय घेतील. परंतु राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास महायुतीचं नुकसान होणार असं देखील रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितलं आहे.