Ramdas Athawale : शिर्डीच्या जागेवर आठवले ठाम! ‘आरपीआय’च्या मागणीनं भाजपची डोकेदुखी…
Ramdas Athawale : लोकसभा जागावाटपावरुन सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी करायला सुरुवात केली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी आपल्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात असं पुन्हा एकदा जाहीरपणे सांगितलं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासह (Shirdi Lok Sabha Constituency)आणखी एक विदर्भातील एखादी जागा द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात विद्यमान खासदार शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांची गोची झाली आहे. त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आढावा घेत आहेत.
Devendra Fadnavis : काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
यावेळी आठवले म्हणाले की, जागावाटपासंदर्भात महायुतीची बैठक झाली नाही. पण आरपीआयला दोन जागा मिळाव्यात अशी सूचना आम्ही केली आहे. एक जागा शिर्डीची आणि दुसरी जागा विदर्भातील कुठलीतरी मिळावी असेही ते म्हणाले.
Mumbai : मुंबईकरांना नवीन वर्षांचे गिफ्ट! मालमत्ता करामध्ये वाढ नाही
आमच्या पक्षाला दोन जागा मिळाली आणि त्या जर निवडून आल्या तर राज्यामध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळणार आहे, आमच्या पक्षाला निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे आरपीआयचे किती आमदार आहेत? किती खासदार आहेत? यापेक्षाही आरपीआयची मतं ही गावागावत आहेत, वस्तीवस्तीत आहेत.
त्यामुळे लोकसभेच्या जागावाटप करताना आरपीआय पक्षाला देखील विसरु नये, असेही यावेळी मंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले. आरपीआयला झुकतं माप द्यावं, आरपीआय पक्ष लहान असला तरी मतं बॅलन्सिंग असणारा पक्ष आहे. त्यामुळं आरपीआयचा विचार गंभीरपणे करावा. विधानसभेच्या संदर्भात काही चर्चा झाली नाही. विधानसभेसाठी किमान 10 तरी जागा मिळाव्यात अशी मागणी केली.
जागांची यादी काढून एकदा अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटणार असल्याचेही यावेळी मंत्री आठवले यांनी सांगितले. सध्या फक्त लोकसभेच्या जागांवरच चर्चा सुरु आहे, त्यामुळे लोकसभेसाठी किमान दोन जागा महायुतीकडून मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जाहीरपणे केली आहे.