Mumbai : मुंबईकरांना नवीन वर्षांचे गिफ्ट! मालमत्ता करामध्ये वाढ नाही

Mumbai : मुंबईकरांना नवीन वर्षांचे गिफ्ट! मालमत्ता करामध्ये वाढ नाही

Mumbai : मुंबईकरांना (Mumbai) नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. कारण मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नाही. असं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त इकबाल सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील तेवढाच मालमत्ता कर मुंबईकरांना भरावा लागणार आहे. त्यामध्ये कोणतीही अतिरिक्त वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत मुंबईकरांनी कोणताही संभ्रम बाळगू नये असा अवाहन चहल यांनी केलं.

लग्नानंतर मुग्धा वैशंपायनचं सासरी ‘असं’ झालं स्वागत!

दरम्यान सध्या ठराविक स्क्वेअर फुटांवर असणाऱ्या मालमत्तांना अतिरिक्त मालमत्ता कर भरावा लागेल. अशी माहिती समोर आली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चौहान यांनी या माहितीवर स्पष्टीकरण देत मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नसल्याचं सांगितलं आहे.

Devendra Fadnavis : काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मात्र मालमत्ता करामध्ये अधिकृतपणे कोणतीही वाढ झालेली नसताना मुंबईकरांना 15 ते 20 टक्के वाढीव रकमेची तात्पुरती मालमत्ता कर देयके पाठवली जात असल्याचं तेथील समोर आला आहे. मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असून वसुलीसाठी महानगरपालिकेकडून 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 1 डिसेंबरपासून मालमत्ता कराची तात्पुरती देयके पाठवण्यास सुरुवात करण्यात आली होती.

मात्र यामध्ये वाढीव रक्कम असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात येत होती. मात्र आता स्वतः इकबाल सिंह चहल यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिल्याने मुंबईकरांना नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे 2015 पासून मुंबईमध्ये मालमत्ता करामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या मालमत्ता उत्पन्नात घट झाली आहे. त्यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात जानेवारी 2022 पासून माफी देण्यात आल्याने, पालिकेचे तब्बल 400 कोटींचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पालिकेसमोर चार हजार पाचशे कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुली करण्याचे लक्ष्य आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज