लग्नानंतर मुग्धा वैशंपायनचं सासरी ‘असं’ झालं स्वागत!

'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला.

त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशताच मुग्धा आणि प्रथमेश यांनी इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे.

मुग्धा आणि प्रथमेश यांचा लग्नसोहळा दापोली येथे पार पडला. लग्नसोहळ्यासाठी मुग्धा आणि प्रथमेश यांनी खास लूक केला होता.

तसेच तिचं आणि प्रथमेशचं औक्षण देखील करण्यात आलं. घरात प्रवेश करण्यापूर्वी प्रथमेश आणि मुग्धानं खास उखाणा देखील घेतला.

मुग्धा आणि प्रथमेश यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुग्धाच्या स्वागतासाठी घराबाहेर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत.
