Raj Thackeray: ‘महाराष्ट्राच सर्कस झालयं…’, राज ठाकरे यांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले
Raj Thackeray Pune News: महाराष्ट्रातील राजकीय भाषा सध्या एकदम खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे. कोणत्याही ट्रोलिंगचा विचार करू नका. (Pune News) राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे असं थेट वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात केले आहे. (Maharashtra Politics) 98 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी या काळात होणार आहे. ( Sharad Pawar) या संमेलनाच्या बोधचिन्हाचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्राचा सध्या झालेला खेळ, ही एक राज्याची सर्कस झाली आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, तर कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात कित्येक लोक राजकारणात असे आहेत की, त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावली पाहिजे. राज्यातल्या राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जात आहे, ज्या गोष्टींचं धरबंधन नाही अशा गोष्टी होत असताना बघायला मिळत आहेत. तिथे त्यांना कानधरून जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे असं वाटतं. तुम्ही त्या अधिकारवाणीने थेट बोलू शकता, सांगू शकतो, असं थेट वक्तव्य राज ठाकरे साहित्यिकांना म्हणाले.
माझं बोलून झालं, विषय संपला
मात्र आम्ही काहीही बोललो तर ट्रोल होईल असा विचार करू नका. मी जे बोलतो, भाषण करतो, त्यावर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येत असतात ते मी वाचत नाही. त्या भानगडीत आजिबात पडत नाही. माझं बोलून झालं, विषय संपला, कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसत नाही. अब्राहम लिंकन यांचं एक छान वाक्य माझ्या वाचनात आलं होत. ते म्हणाले होते, जे लोकं तुमच्यावर प्रेम करत असतात ते स्पष्टीकरण मागत नसतात. जे तुमचा द्वेष करतात ते स्पष्टीकरण ऐकत नाही. मग कशाला देता स्पष्टीकरण ? असं थेट ठाकरे यावेळी म्हणाले.
‘हा तर पोरकटपणा’ भावी मुख्यमंत्री पदावर Sharad Pawar थेट बोलले
साहित्यिकांनीच आता भूमिका घ्यावी
म्हणून साहित्यिकांनीच आता भूमिका घ्यावी. राजकारण्यांची भाषा खालवत चाली आहे, खालच्या थराला जाऊन लोक काहीही बोलत आहेत, त्यांना समजावणारं कोणीच नाही. ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी असल्याचे चित्र आहे. यावरून अजून काय बोलायचं ? ही जबाबदारी साहित्यिकांनी घेणं अतिशय महत्वाची आहे. संमेलन होत राहील, पुस्तकं येत राहतील. पण साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करावी. मात्र राजकारणात जी खालच्या थराची भाषा वापरली जात आहे, भविष्यात जी मुलं राजकारणात येणार आहे, त्यांना वाटतं हेच राजकारण. ही भाषा म्हणजे राजकारण. राज्याचं अध:पतन होण्याचं कारण म्हणजे चॅनल मीडिया. हे लोक जेव्हा दाखवायचं बंद करतील, तेव्हा हे बंद होईल. साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनावले पाहिजे. असं राज ठाकरे यावेळी पुण्यात म्हणाले.