Pune News : होय, मी लढणार अन् जिंकणार! भिमालेंनी दंड थोपटल्याने माधुरी मिसाळांना टेन्शन…

Pune News : होय, मी लढणार अन् जिंकणार! भिमालेंनी दंड थोपटल्याने माधुरी मिसाळांना टेन्शन…

Parvati Vidhansabha : राज्यात आता लोकभेनंतर विधानसभेचं वारं वाहु लागलंय. सर्वच पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. अशातच आता पुण्यातील पर्वती मतदारसंघातील (Parvati Vidhansabha) नगरसेवक श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांनीही दंड थोपटल्याने भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, लढणार आणि जिंकणार या टॅगलाईनचा भिमाले यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल झालायं. या व्हिडिओमध्ये भिमाले विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर लेटस्अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना भिमाले यांनी होय, मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे.

भिमाले पुढे बोलताना म्हणाले, माझ्या कार्यकर्त्यांनी माझा व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडिओ खरा असून माझं लोकसभा निवडणुकीपासूनच ठरलंयं की मला यावेळी विधानसभा लढायची हे मी वरिष्ठांशी कानावर घातलं आहे. माझी विधानसभेसठी 20 वर्षांपासून तयारी सुरु आहे. मी पुण्याचा प्रभारी म्हणून काम करतोयं. या मतदारसंघातील लोकांशी माझी नाळ असून मला वरिष्ठांकडून आशा आहे, ते मला संधी देतील. मी विधानसभा लढणार आणि जिंकणार असल्याचं भिमालेंनी स्पष्ट केलंय.

Pune Water: पाणी कुठं तरी मुरतंय; आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

तसेच मागील वीस वर्षांपासून मी नगरसेवक असून मी 15 वर्षांपासून भाजपच्या नेत्यांकडे विधानसभेच्या तिकीटाची मागणी करीत आहे. या मतदारसंघात मेट्रो ट्रेन, उड्डाणपूलासाठी मी अनेक प्रयत्न केलेले आहेत. माझ्याकडे विकासाचं व्हिजन आहे. त्यामुळे मला संधी मिळाली पाहिजे आमदारकीनंतर मी लोकांचे प्रश्न सोडवणार असून पक्षाचा निर्णय शेवटी अंतिम राहणार असल्याचं भिमाले यांनी स्पष्ट केलंय.

आजचे राशी भविष्य 3 July 2024: थोडी घाई करावी लागेल… पण कशासाठी? तुमच्या राशीतील आजचं गुपित काय?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बुथ, योजना, कार्यक्रम, बैठका घेत आम्ही फिरत होतो. त्या माध्यमातून आम्ही काम केलंय. या मतदारसंघातील 60 हजार घरात आम्ही पोहोचलोयं. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आला असल्याचंही भिमालेंनी स्पष्ट केलंय. पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून त्या सलग दोनवेळा निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी दिली जाणार की नव्या चेहऱ्याला हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज