Download App

पिया तू अब तो आ जा म्हटलं, तर मी मोनिका ओ माय डार्लिंग म्हणेन, फडणवीसांनी घेतली शेलारांची फिरकी

आशा भोसलेंनी (Asha Bhosle) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री आशिष शेलारांना चक्क स्टेजवर गायला लावलं.

  • Written By: Last Updated:

Asha Radio Award : ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ (Maharashtra Radio Festival) आणि ‘आशा रेडिओ पुरस्कार’ (Asha Radio Award) 2025 सोहळ्यात गायिका आशा भोसलेंनी (Asha Bhosle) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री आशिष शेलारांना (Ashish Shelar) चक्क स्टेजवर गायला लावलं. यावेळी फडणवीसांनी शेलारांची चांगलीच फिरकी घेतली. शेलारांनी पिया तू अब तो आ जा म्हटलं, तर मी मोनिका ओ माय डार्लिंग म्हणेन, असं फडणवीस म्हणाले.

दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला ‘सेलिब्रिटी योगा’चा उत्सव 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बोलताना आशा भोसले म्हणाल्या की, मी पंधरा वर्षाची असताना रेडिओवर कार्यक्रम करायचे. पूर्वी टीव्ही, मालिका असं काही नव्हतं. तो काळच वेगळा होता. आजही मी रेडिओवर गाणं ऐकते. मी गाडीमध्ये जेव्हा प्रवास करते, तेव्हा लतादीदींचे गाणे ऐकते, असं म्हणत्या त्यांनी प्रेक्षकांसोबत गाणं गायलं. यावेळी स्टेजवर उपस्थित असलेल्या फडणवीसांच्या हातात माईक देत त्यांना गाणं गायला लावलं. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आई हो बहार बनके छाई हो, हे गाणं फडणवीसांनी म्हटलं.

त्यानंतर आशाताईंनी शेलारांच्या हातात माईक देत आता तुम्ही गाणं म्हणा, असं सूचवलं. मात्र, मी पाया पडतो असं म्हणत अन् आवाजाचं कारणं देत त्यांनी नकार दिला. तर शेलार हे घरात गाणं म्हणतात, आईची शप्पथ मी खरं सांगते, असं आशा भोसलेंना सांगितलं. त्यानंतर कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकानं रंग बरसे आणि ‘पिया तू अब तो आ जा या गाण्यांची फर्माईशी शेलारांकडे केली. त्यावर फडणवीसांनी पिया तू अब तो आ जा म्हटलं, तर मी मोनिका ओ माय डार्लिंग म्हणेन, अशी फिरकी घेतली. फडणवीस साहेब माझी खेचत आहेत, असं सांगत शेलारांनी अखेर नाच रे मोरा अंब्याच्या वनातनाच रे मोरा नाच !, हे गाणं गायलं.

‘सितारे जमीन पर’ने बॉक्स ऑफिसवर केली धडाकेदार सुरुवात! आमिर खानची जादू पुन्हा चालली 

याच कार्यक्रमात फडणवीस यांची 5 रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली. यावेळी अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच स्वरचित कविताही ऐकवल्या. कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्ही मॉडेलिंग केलं, तुम्हाला लिहिण्याचा छंद आहे. तुम्ही गीतकार आणि कवी देखील आहात. तुम्ही पहिल्यांदा काय लिहिलं होतं? काही आठवते का? असा सवाल रेडिओ जॉकीने विचारल्यावर फडणवीस म्हणाले की, सर्वप्रथम मॉडेलिंग हा केवळ अपघात होता. माझ्या मित्राने माझ्यावर एक प्रँक केलं होतं, त्यावेळी हा प्रँक चालला. पण, त्यानंतर मी कधीही मॉडेलिंग करण्याचे धाडस केले नाही. मी केलेले मॉडेलिंग त्यावेळी चांगलंच गाजलं, असंही फडणवीस म्हणाले. जर कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नसते. पण जर माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी असते. माझं मॉडेलिंग म्हणजे माणसाचं कुत्र्याला चावणं होतं, म्हणून ती बातमी झाली, अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली.

 

follow us