Haryana Elections : हरियाणाच्या मैदानात आता (Haryana Elections 2024) विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया देखील नशीब (Vinesh Phogat) अजमावताना दिसतील. या दोन्ही कुस्तीपटूनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश (Congress Party) केला. यानंतर काँग्रेसने विनेशला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. हरियाणाच्या राजकारणात खेळाडूंची एन्ट्री काही नवी नाही. 1970 च्या दशकात चौधरी वीरेंद्र सिंह पहिल्यांदा खेळाच्या मैदानातून राजकारणात आले होते. राजकारणात त्यांची इनिंग यशस्वी राहिली. आमदार, खासदार आणि मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला. यानंतरही अनेक खेळाडूंनी हरियाणाच्या राजकारणात (Haryana Politics) पदार्पण केलं पण त्यांचं राजकारण हेलकावे खात राहिले. यातील काही जण तर असे होते की राजकारणाच्या मैदानात पाय ठेवताच हिट विकेट झाले. सगळ्यात आधी बबिता फोगाट बाबत जाणून घेऊ या..
महिला कुस्तीपटू बबिता फोगाटने (Babita Phogat) कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकले होते. सन 2019 मध्ये बाबिताने राजकारणात पदार्पण केले. बनिताने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. यानंतर पक्षाच्या तिकिटावर दादरी येथून निवडणूक लढवली होती. मात्र येथे बबिता फोगाटचा पराभव झाला. या निवडणुकीत बबिता थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. यानंतरही बबिता राजकारणात सक्रिय राहिली. अनेक मुद्द्यांवर भाजपाची बाजू मजबुतीने मांडत राहिली. पुढे 2024 च्याच निवडणुकीत पुन्हा दादरी मधून उमेदवारी मिळेल असे वाटत होते. परंतु भाजपने यावेळी बबिताचा विचार केला नाही. आता उमेदवारी नाकारल्यानंतर दोन दिवसांनी बबिताने प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने जो निर्णय घेतला त्या बरोबर राहू असे बबिताने म्हटले आहे.
पॉलिटिक्ससाठी राजीनामा! विनेश फोगाटने सोडली रेल्वेतील सरकारी नोकरी
पहिलवान योगेश्वर दत्त 2019 मध्ये भाजपच्या माध्यमातून राजकारणात आला होता. 2019 मध्ये पक्षाने त्यांना बरोदा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे 2020 मध्ये या मतदारसंघातील आमदाराचे निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत सुद्धा योगेश्वर दत्तला विजयी होता आले नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत (Olympic Games) पदकाचा मानकरी ठरलेल्या योगेश्वर दत्तला यावेळी मात्र भाजपने तिकीट दिलेले नाही. उमेदवारी मिळाली नाही म्हणून योगेश्वर दत्त नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. योगेश्वर आता राजकारणात राहणार की नाही अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
माजी क्रिकेटपटू कृष्णमूर्ती हुड्डाच राजकारण सुरुवातीच्या काळात तेजीत होतं. परंतु कालांतराने त्यांच्या राजकारणालाही उतरती कळा लागली. काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या हुड्डा यांना सुरुवातीला आमदारकी मिळाली. मंत्रीही बनले. पण काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर हुड्डा सुद्धा राजकारणातून साईडलाईन झाले. फेब्रुवारी 2024 मध्ये कृष्णमूर्ती यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) त्यांनी भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या विरोधात उमेदवारी मिळेल असे वाटत होते. भाजपने मात्र त्यांना सिंबल दिलेच नाही.
योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांच्याबरोबरच 2019 मध्ये राजकारणात एन्ट्री घेणारे आणखी एक खेळाडू संदीप सिंह. हॉकीच्या मैदानातून संदीप सिंह राजकारणात आले. मनोहर लाल खट्टर यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. परंतु नंतर त्यांचं राजकारणच थांबलं. सैनी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. नंतर भाजपने त्यांना तिकीटही नाकारलं. हॉकी प्लेअर संदीप सिंह अर्जुन पुरस्कार विजेता आहेत.
हरियाणात ‘आप’ कमकुवत तरीही आघाडीसाठी काँग्रेसचा आग्रह; राहुल गांधींची स्ट्रॅटेजी काय?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष रणबीर महेंद्रा 2005 मध्ये हरियाणाच्या राजकारणात आले. मुंधाल खुर्द मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला. यानंतर मात्र त्यांना सलग पराभवांना सामोरे जावे लागले. 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर भद्रा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र या तिन्ही वेळेस त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
बॉक्सर विजेंद्र सिंहने सुद्धा राजकारणात नशीब अजमावून पाहिलं आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत विजेंदरने काँग्रेसच्या तिकिटावर दक्षिण दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत विजेंदर तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला डिपॉजिट देखील वाचवता आलं नाही. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिलं नाही. त्यानंतर विजेंद्रने भाजपात प्रवेश घेतला. सध्या विजेंद्र हरयाणाच्या राजकारणात सक्रिय आहेत. भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. यात मात्र विजेंद्रचं नाव नाही.