Download App

BJP Candidates List : हरियाणात भाजपचे 67 शिलेदार ठरले; पहिली यादी जाहीर

भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये 67 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत.

BJP Candidates List : भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Hariyana Election) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीयं. भाजपच्या पहिल्या यादीत 67 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीनुसार मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपने अंबाला कँटमधून अनिल विज यांना उमेदवारी दिली आहे. तर कॅप्टन अभिमन्यू यांना नारनौलमधून तिकीट मिळालंय.

प्रकाश धनखर यांना तिकीट…
भारतीय जनता पक्षाने फरिदाबाद विधानसभा मतदारसंघातून विपुल गोयल यांना उमेदवारी दिली आहे, तर जगधारी मतदारसंघातून अमरपाल गुर्जर यांना तिकीट दिले आहे. ओमप्रकाश धनखड यांना भाजपने बदली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कालका विधानसभा मतदारसंघातून शक्ती राणी शर्मा यांना तिकीट मिळाले आहे. भाजपने पंचकुलातून ज्ञानचंद गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे, तर असीम गोयल यांना अंबाला शहरातून तिकीट देण्यात आले. मुलाणा मतदारसंघातून संतोष सरवान यांच्यावर पक्षाने विश्वास व्यक्त केला आहे.

‘जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आता विधानसभेत … ‘, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला

कार्तिकेय शर्मा यांच्या मातोश्रींना तिकीट…
कुलदीप विश्नोई यांचा मुलगा भव्य विश्नोई याला आदमपूरमधून तिकीट मिळाले. बावनीखेडा येथून विसंभर वाल्मिकींचे तिकीट रद्द, कपूर वाल्मिकी यांना तिकीट मिळाले. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांच्या पत्नी अंबाला शहराच्या महापौर शक्ती राणी शर्मा यांनाही कालका येथून तिकीट देण्यात आले. शक्ती राणी शर्मा या अपक्ष राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांच्या आई आहेत.

नताशाच्या घटस्फोटानंतर अगस्त्य पहिल्यांदाच वडिलांच्या घरी पोहोचला, क्रिकेटरच्या वहिनीने शेअर केला फोटो

देवेंद्र बबली यांना टोहना येथून तिकीट…
सुनील सांगवान यांना दादरीतून तिकीट मिळाले असून, त्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते भोंडसी कारागृहाचे अधीक्षक होते. तर रतिया येथील माजी खासदार सुनीता दुग्गल यांचे तिकीट सुटले आहे. गोहाना येथून माजी खासदार अरविंद शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे. जेजेपी सोडून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मंत्री आणि आमदार देवेंद्र बबली यांना टोहना येथून उमेदवारी देण्यात आली.

दरम्यान, भाजपने जेजेपीच्या तीन माजी आमदारांना तिकीट दिलंय. टोहना येथून देवेंद्र बबली, सफिडॉनमधून रामकुमार गौतम आणि उकलाना येथून अनुप धनक यांना तिकीट. गेल्या वेळी भाजपने रानियान विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेल्या रणजीत चौटाला यांचे तिकीट रद्द केले. ते हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक हरले. रणजीत चौटाला यांनी भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

follow us