Download App

AI नौदलासाठी वरदान! युद्धप्रसंगी कोणतं शस्त्र वापरायचं याची माहिती देणार

Indian Navy : भारतीय नौदल अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यासाठी युद्धसामग्री बनवत आहे. त्यासाठी नवीन पिढीतील लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, सॉफ्टवेअर-परिभाषित रेडिओ आणि प्रगत डेटा लिंक यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वायत्त मानवरहित जहाजं विकसित केली जात आहेत. नव्या युगातील जहाजांमध्ये एआय सिस्टीमची मदत घेतली जाणार आहे. त्याद्वारे युद्धाच्यावेळी समोरुन येणारे धोकेही ओळखता येणार आहेत. त्याचबरोबर युद्धप्रसंगी नेमकी कोणती शस्त्र, अस्त्र वापरावी याची देखील माहिती एआय देणार आहे. त्यामुळे नौदलासाठी एआयचा वापर मोठा फायदा मिळवून देणारा ठरणार आहे.(indian navy first autonomous boat ai will tell the which weapon to use)

…त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री होणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराने केला दावा

भारतीय नौदल आता मोठ्या प्रमाणावर सायबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), बिग डेटा अॅनालिटिक्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करत आहे. अशा प्रकारच्या अत्याधुनिक मानवरहित बोटींचा वापर अमेरिका आणि चीनसारखे देश करत आहेत.

दलित, आदिवासींचं शिक्षण हिसकावून काय मिळालं?, विधानसभेत पटोलेंचा आक्रमक पवित्रा…

वेपन्स अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (WESEE) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांनी विकसित केलेल्या भारतीय नौदलाच्या पहिल्या स्वायत्त बोटीची नोव्हेंबरमध्ये मुंबई आणि गोवा दरम्यान चाचणी होणार आहे. यामध्ये स्वदेशी कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टमने सुसज्ज नौका वापरल्या जातील, त्यात एआय योग्य शस्त्रे कोणती आहेत, हे सांगेल. ही बोट 15 मीटर लांब आहे. आगामी 10 वर्षांत विविध आकार आणि प्रकारांच्या युद्धसामुग्रीमध्ये वाढ करण्याची आणि त्याचा समावेश नौदलामध्ये करण्याची योजना आहे.

अशा मानवरहित बोटींचा वापर अमेरिका आणि चीनसारखे देश पूर्वीपासून करत आहेत. या बोटी जमीनीवर आणि पाण्याखाली राहण्याच्या दुहेरी क्षमतेचा फायदा युद्धाच्या वेळी होतो आणि ते अगदी परवडणारे देखील आहेत. या बोटींशी लढण्याचा मार्गही हायपरसॉनिक आणि डायरेक्‍ट-एनर्जी वेपन्सप्रमाणे बदलला आहे.

भारतीय नौदल लवकरच स्वदेशी लढाऊ व्यवस्थापन प्रणालीची (CMS) चाचणी सुरु करण्याची योजना आखत आहे. या तांत्रिक केंद्रात रडार, सोनार आणि इतर सेन्सर्स, तसेच इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे एकत्रीकरण असेल. WESEE ने 2024 ते 2029 पर्यंतच्या सर्व युद्धनौकांमध्ये नवीन CMS समाविष्ट करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

या CMS मधील AI अल्गोरिदमद्वारे, 24 ते 29 वेगवान धोके ओळखले जाऊ शकतात आणि युद्धासाठी सर्वात योग्य शस्त्रे निवडण्यात युद्धनौकांना मदत करेल. त्यात सध्याच्या युद्धनौकांच्या सीएमएसशी संवाद साधण्याची क्षमताही असेल.

WESEE आणि BEL ने तीन भिन्न प्रकारांसह उच्च-स्तरीय एनक्रिप्टेड सॉफ्टवेअर-डिफाइन्ड रेडिओ (SDRs) विकसित केले आहेत. या SDR मध्ये मल्टीमीडिया क्षमता आहे. ते लांब अंतरावर डेटा पाठवू शकतात. WESEE ने नवीन जनरेशन डेटा लिंक-II प्रणाली देखील विकसित केली आहे.

Tags

follow us