Download App

झोमॅटो-स्विगी होणार स्वस्त; ISROच्या सॅटेलाईटमुळे ‘खवय्यांची’ दिवाळी

NVS-01 Satellite Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विशेष नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च केलं आहे. शास्त्रज्ञांनी काल रविवारीच याचं काऊंटडाऊन सुरू केलं होतं. त्यासाठी 27.5 तासांचं काऊंटडाऊन सेट करण्यात आलं होतं. भारतीय जीएसएलवी रॉकेटच्या मदतीने हे सॅटेलाईट आज 10.42 बजे लॉन्च करण्यात आलं. हे नेव्हिगेशन सॅटेलाईट सिरीजच्या सेकेंड जेनरेशन रिजनल सॅटेलाईट आहे.

हे सॅटेलाईट रिअल टाईम जिओपोजिशनिंग आणि टायमिंग सर्विसेस देणार आहे. तर या सॅटेलाईटला ‘एनवीएस-01’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याचं वजन 2,232 किलो आहे. इस्त्रोने सांगितलं की, एनवीएस-01 च्या नेविगेशन पेलोड्समध्ये एल1, एल5 आणि एस बॅंड समाविष्ट आहे. ज्यामध्ये पूर्वीच्या सॅटेलाईटच्या तुलनेत देशात विकसित रुबिडियम परमाणु घड्याळ लावण्यात आलं आहे. अगोदर भारत इंपोर्टेड रुबिडियम परमाणु घड्याळाचा वापर करत होता.

Temple Dress Code : तुळजापूरचा निर्णय मागे पण ड्रेस कोडचं लोण राज्यभर; नागपूर, पुणे, जळगावातही नियम लागू

ISRO ने आज प्रक्षेपित केलेल्या मोहिमेत NVS-01 हा नेव्हिगेशन उपग्रह GSLV वरून अवकाशात पाठवण्यात आला आहे. या उपग्रहातून भारताला स्वतःची नेव्हिगेशन सिस्टीम मिळेल. NVS-01 चा फोकस देशाच्या संपूर्ण भागावर असेल आणि GPS पेक्षा याची नकाशा सेवा चांगली उपलब्ध होईल.

तुम्हाला माहिती आहेच की GPS चा वापर फूड डिलिव्हरी आणि कॅब राइडसाठी केला जातो. जीपीएस एक नकाशा नेव्हिगेशन प्रणाली आहे जी लोकांना नकाशांद्वारे प्रवास करण्यास मदत करते. सध्या, Zomato-Swiggy आणि Ola-Uber सारख्या कंपन्यांना GPS नेव्हिगेशन सिस्टम महाग वाटतात. त्यामुळे त्यांची सेवाही थोडी महाग आहे.

मात्र, NavIC नेव्हिगेशन प्रणाली सुरू केल्यानंतर या कंपन्यांना स्वस्त दरामध्ये नकाशा सेवा मिळू शकते. याचा थेट परिणाम कंपनीच्या खर्चावर होणार आहे. म्हणजेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि कॅब कंपन्यांचा खर्च कमी होईल. यानंतर या कंपन्या त्यांच्या सेवा शुल्कात कपात करू शकतात. NavIC आल्यानंतर लोकांना अशी स्वस्त सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.

Video : ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मनोज वाजपेयीची लढाई

आतापर्यंत आपण अमेरिकन सॅटेलाइटवर अवलंबून होतो, पण आता आपली स्वतःची नेव्हिगेशन सिस्टीम मिळणार आहे. हे GPS पेक्षा चांगले असेल आणि अधिक अचूक स्थान माहिती देईल. NavIC संपूर्ण भारत आणि देशाच्या सीमेपासून 1,500 किमी पर्यंतचा परिसराचा नकाशा दर्शवेल.

Tags

follow us