Download App

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये सापडले अवैध शस्त्र, ७ जणांना पोलीसांनी घेतलं ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने नमुद परिसरात सापळा लावुन यातील संशयीत ईसम यांचेवर पाळत ठेवत आरोपी ताब्यात.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Crime : खुलताबाद शहरात अवैधरित्या (Crime) शस्त्र बाळगणाऱ्या ७ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी उचलले. या छाप्यात एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, चार तलवारी व एक कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जिल्हयातील अवैधरित्या छुप्यापध्दतीने घातक शस्त्र बाळगुन दहशत माजवणाऱ्यावर कारवाई केली.

खुलताबाद शहरात पोलीस पथक गस्तीवर असतांना, त्यांना गोपीनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली कि, खुलताबाद शहरातील बडकेआली मोहल्ला, सईदानी माँ मोहल्ला, गुलाबशहा कॉलनी, साळीवाडा ,बाजारगल्ली, कुरेशी मोहल्ला या परिसरातील ०७ ईसमाकडं घातकशस्त्र असुन त्याआधारे ते परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे.

IT ची नोटीस, दानवेंचे गंभीर आरोप अन् फडणवीसांकडून चौकशी; संजय शिरसाट कसे फसले?

या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने नमुद परिसरात सापळा लावुन यातील संशयीत ईसम यांचेवर पाळत ठेवत आरोपी ताब्यात घेतले. या आरोपींवर पोलीस ठाणे खुलताबाद येथे कलम ४, २५, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दरम्यान माहिती मिळाली की, खुलताबाद शहराताली गुलाब शहा कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ परिसरातील राहणारा अजमत खान अजीज खान हा विनापरवाना बेकायदेशरीपणे गावठी कट्टा बाळगुन आहे.

ताब्यात घेतले यामध्ये १) मोहमंद अल्तमश मोहमंद फईम वय २७ वर्षे रा. बडकेआली मोहल्ला, खुलताबाद २) मोहमंद मुजाहिद निसार कुरेशी वय २४ वर्षे रा. बडकेआली मोहल्ला, खुलताबाद ३) फलक शहा नासेर शहा, वय २२ वर्षे रा. सईदानी माँ मोहल्ला, खुलताबाद ४) फईजान शहा अब्दुल शहा वय २६ वर्षे रा. बाजारगल्ली (साळीवाडा), खुलताबाद यातील आरोपीने त्यांचे राहते घराचे आजुबाजूच्या परिसरात धारधार शस्त्र तलवार, धारधार कोयता शस्त्र लपवुन ठेवलेले पथकाला काढून दिलं आहे.

follow us