Union Budget : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, राष्ट्रपतींचं अभिभाषण

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Parliament Budget Session) आजपासून सुरुवात होणार आहे. हे 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं (Presidential Address) आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman)या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षातील पहिलंच अधिवेशन असल्यानं त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होणार […]

Nirmala

Nirmala

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Parliament Budget Session) आजपासून सुरुवात होणार आहे. हे 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं (Presidential Address) आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman)या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षातील पहिलंच अधिवेशन असल्यानं त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल (Economic Survey) संसदेच्या पटलावर ठेवतील.

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरू राहणारंय. तर मध्यंतरीच्या काळात काही दिवसांचा ब्रेक असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणारंय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्या म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2023-24 सालचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणारंय. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरही चर्चा होणारंय.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारं वक्तव्य केलंय. पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही नवीन कर लागणार नसल्याचंही सांगितलंय.

Exit mobile version