Chief Justice Bhushan Gavai Mother on Threw Shoes At him : सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. (CJI) सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. आता या वकिलाविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच बार कॉउन्सिल ऑफ इंडियाने प्रॅक्टिस स्थगित केली आहे.या प्रकारावर आता सरनायाधीश भूषण गवई यांच्या आई आणि नेत्या कमलताई गवई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सरन्यायाधीश गवई यांच्या आई म्हणाल्या…
या विषयावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आणि नेत्या कमलाताई गवई यांनी आपली तीव्र भूमिका मांडली. त्यावेळी बोलताना कमलताई गवई म्हणाल्या की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली घटना आपण जगा आणि इतरांनाही जगू द्या या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊन आराजगता वाढवण्याचा कोणालाही अधिकार नाही. सर्वांनी आपले प्रश्न शांततेने आणि संविधानिक मार्गाने सोडवावे. तर बहिण कीर्ती गवई म्हणाल्या की, कालची घटना देशाला काळीमा लावणारी आहे. हा केवळ व्यक्तिगत हल्ल्याने असून एक विषारी विचारधारावर जी थांबली पाहिजे. असंवैधानिक वागणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आपण याचा निषेध केला पाहिजे. पण बाबासाहेबांच्या विचारांना कुठेही धक्का लागू नये यासाठी शांततेने आणि कॉन्स्टिट्यूशन लेव्हलवरच निषेध असावा. असेही यावेळी कीर्ती गवळी म्हणाल्या.
मोदी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळी आणि छठनिमित्त रेल्वे प्रवाशांना गिफ्ट अन् 4 नवीन मर्गांची घोषणा
नेमकं प्रकरण काय?
सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. (CJI) सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. यावेळी तो वकिल आरडाओरडा करत होता, सनातनचा अपमान सहन करणार नाही. CJI गवई हे सर्व सुरु असताना शांत होते. ते म्हणाले की, अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरु ठेवा टिप्पणी केली. या टिप्पणींचा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय. सुरक्षारक्षक या घटनेचा इन्कार करतायत. ते म्हणतायत की, कोर्टात एका माणसाने आरडाओरडा केला. त्याला आम्ही बाहेर काढलं.
Maharashtra Cabinet Decision : तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा, मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय