Landslide in Himachal crushes bus, 18 killed, many injured : हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बिलासपूर जिल्ह्यातील झंडूता विधानसभा क्षेत्रातील बरठी परिसरात सायंकाळी भूस्खलन झालं. त्यानंतर झालेल्या भीषण अपघातामध्ये बसवर मोठी दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
केवळ एक बदल करत प्रभाग रचना आरक्षणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!
बिलासपुर मधील भल्लू पुलाजवळ एका बसवर अचानक दरड कोसळली. या बसमध्ये तब्बल 30 प्रवासी प्रवास करत होते. ही घटना घडतात स्थानिक नागरिकांनी, प्रशासनाने आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ बचाव कार्य सुरू केलं. जखमींना घुमारवी आणि झेंडूता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दगडूशेठ गणपती अन् लालबागच्या राजाकडून पूरग्रस्तांना मदत, निधी सरकारकडे सुपूर्द!
या घटनेतील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी देखील आहेत. यावर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी दुःख व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांनी या कठीण काळामध्ये कुटुंबीयांच्या सोबत असल्याचे सांगितलं तसेच प्रशासनाला बचाव कार्यात अधिक गती आणण्याचे निर्देश दिले असून जखमींना त्वरित उपचार आणि वैद्यकीय सोयींची पूर्ण व्यवस्था करण्याचे ही आदेश दिले आहेत.