Download App

Tirupati Controversy : तिरुपती ‘लाडू’त चरबी! जाणून घ्या, कसा तयार केला जातो लाडू प्रसादम्..

देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय.

Tirupati Tirumala Balaji Temple : देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Tirumala Balaji) प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय. खरंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच (Chandrababu Naidu) या प्रसादाबाबत मोठा खुलासा केला होता. आधीच्या वाएसआर काँग्रेस सरकारच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा अत्यंत धक्कादायक आरोप नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपात तथ्य असल्याचेही सिद्ध झाले. प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलं. नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डानेच हा खुलासा केला.

या रिपोर्टनुसार लाडू प्रसाद तयार करताना त्यात माशांचे तेल, बीफ, प्राण्यांची चरबी या साहित्यांचा वापर केला जात होता. विशेष म्हणजे हा प्रसाद फक्त भाविक भक्तांनाच नाही तर चक्क देवालाही अर्पण होत असतो. आता या प्रसादावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. देशभरातील हिंदू धर्मियांतही संतापाची लाट उसळली असून या प्रकाराची अधिक सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 बारामतीचा प्रसाद नगरकरांना मानवणार नाही.. रोहित पवारांवर विखे पाटलांचे टीकास्त्र

200 वर्षांपासूनची परंपरा

तिरुपती बालाजी मंदिरात या खास पद्धतीचे लाडू मिळतात. प्रसादाशिवाय भगवान बालाजीचं दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते. मंदिरातील लाडू तयार करण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. लाडू तयार करताना स्वच्छतेची अतिशय काळजी घेतली जाते. लाडू तयार करण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह आहे. प्रसाद तयार करण्यासाठी आधी लाकडांचा वापर केला जात होता. 1984 पासून एलपीजी गॅसचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी दररोज आठ लाख लाडू तयार केले जातात.

कसा तयार केला जातो लाडू प्रसाद

तिरुपती बालाजी मंदिरात तयार केला जाणारा लाडू प्रसाद खास पद्धतीने तयार केला जातो. याला दित्तम असेही म्हटले जाते. हा प्रसाद तयार करण्यासाठी बेसन, काजू, सुकामेवा, खडीसाखर, तूप, विलायची वापरतात. आतापर्यंत दित्तममध्ये फक्त सहा वेळा बदल करण्यात आले आहेत. दररोज प्रसाद तयार करण्यासाठी दहा टन बेसन, दहा टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो विलायची, 300 ते 400 लीटर तूप, 500 किलो खडीसाखर, 540 किलो मनुके या पदार्थांचा वापर केला जातो. या पद्धतीने लाडू प्रसाद तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

(टीप : येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता आणि माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लेट्सअप मराठी याची खात्री देत नाही.)

follow us